फलटण प्रतिनिधी फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणार दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये मंगळवार दि.३१ रोजी शाळेमध्ये आहिल्यादेवी होळकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली शिंदे मॅडम यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मुलांना अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनाची संघर्ष कथा सांगितली. त्याचबरोबर त्यांनी मुलांना अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श घेऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित विध्यार्थ्यांना शिक्षकांनी मार्गदर्शन केले.यावेळी कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे , शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार ,सविता जगताप, संध्या जगताप, पुनम शेलार , स्नेहल पवार, सुषमा गायकवाड, उपस्थित होते.






















