बेकायदेशीर प्रतिनियुकत्याना जिल्हा परिषद साताराचे अभय – – नुकतेच जिल्हा परिषद मधील बेकायदेशीर प्रतिनियुक्ती बाबत कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे वारंवार निवेदने देवून तसेच तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे कडे देवूनही प्रशासनाने सदर प्रतिनियुक्तीस अभय देण्याचे काम मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेले आहे असा स्पष्ट आरोप कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष – अजित वाघमारे यांनी केला आहे . जि प प्रशासन अश्या बेकायदेशीर प्रतिनियुक्तीवर असणाऱ्या कर्मच्याऱ्यांना पाठीशी घालत आहे हे कळाल्या नंतर अजित वाघमारे जिल्हा २६ जानेवारी रोजी आत्मदहन नोटीस बजावली त्यानंतर मा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फौजदारी शाखेने आजित वाघमारे यांना आत्महत्येस परावृत्त करणेबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवले त्यानंतर दि २३ जानेवारी रोजी दुपारी १ : ३० वाजता मा . अर्चना वाघमळे ( सा . प्र . अतिरिक्त पदभार ) उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात बैठक आयोजीत करण्यात आली . सदरच्या बैठकीत स्वतः वाघमळे मॅडम कबुल करतात श्री निकम यांची बेकायदेशीर प्रतिनियुक्ती आहे . पण सदरची प्रतिनियुक्ती रद्द न करता संबंधीत कर्मच्या ऱ्याचा विनंती बदलीचा बेकायदेशीर प्रस्ताव मा. विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे . एकुणच जि प मध्ये बेकायदेशीर काम करणारांना अभय दिलं जातय का ? जि.प . सातारा मध्ये अश्या अजुन किती बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या आहेत . या बाबत मा विभागीय आयुक्त पुणे हे चौकशी लावणार का? बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या व एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कर्मचारी बाबत जिल्हा परिषद प्रशासनाकडून २ जुलै २०१४ ग्राम विकास विभागचा शासन निर्णयाची पायमल्ली झालेली आहे ही बाब जि प . चे मा .मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.ज्ञानेश्वर खिलारे हेतु परस्पर दुर्लक्षीत करीत आहेत अशी संघटनेची धारणा झालेली असुन याबाबतची रितसर तक्रार राज्याचे मुख्य सचिव यांचेकडे संघटना करणार असुन बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या व वर्षानुवर्ष ठाण मांडून बसलेले कर्मच्यारी यांचे बाबत न्यायालयातही दाद मागणार आहे अशी माहिती कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अजित वाघमारे यांनी दिली .