महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : लोणंद
डोंबाळवाडी येथील नायकोबा डिपी बसवुन शिवसेनेकडुन फलटण तालुक्यात डिपी बसवण्याची सातत्याने जोरदार मालिका सुरु आहे. शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांच्या दमदार कामगिरीमुळे फलटण तालुक्यातील शेतक-यांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथील नायकोबा डिपी दोन महिन्यांपासुन बंद अवस्थेत असल्याची शेतक-यांची तक्रार शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांचेकडे आली होती. तक्रारीनुसार डोंबाळवाडी येथील नायकोबा डिपी बंद अवस्थेत असल्याने वीजपुरवठ्या अभावी तेथील स्थानिक शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाले होते. विहीरीत पाणी असुनही वीज पुरवठ्याअभावी लाभ घेता येत नव्हता. शेतपीकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे डोंबाळवाडी येथील शेतक-यांनी सदर समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेकडे संपर्क केला होता.
त्यानुसार डोंबाळवाडी येथील शेतकरी समस्येची दखल घेत शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी बारामती येथील वीज महावितरणचे मुख्य अभियंता सुनिल पावडे यांचेशी संपर्क साधुन सदर विषयावर घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे फलटण तालुका वीज महावितरणने शेतकरी समस्येची दखल घेत दिनांक 13/12/2020 रोजी ट्रान्सफाॅर्मर जोडुन शेतक-यांना वीज पुरवठा सुरळीत करुन दिला आहे. याबद्दल डोंबाळवाडी येथील जागरुक शेतक-यांचे शिवसेनेच्यावतीने फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी विशेष जाहीर आभार मानले.
डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेला की वीज महावितरणने दोन दिवसात डिपी बसवणे बंधनकारक आहे. डिपी नादुरुस्त झाला अथवा चोरीला गेल्यास वीज महावितरणने डिपी बसवण्यासाठी पैसे मागितल्यास तात्काळ शिवसेनेकडे संपर्क साधावा असे आवाहन शिवसेनेच्यावतीने फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी केले आहे. कारण बारामती वरिष्ठ कार्यालयाने फलटण वीज महावितरण कार्यालयास शेतक-यांकडुन डिपी बसवण्यासाठी पैसे घेऊ नका असे सक्त आदेश दिले असल्याचे शिवसेना फलटण तालुका प्रमुख प्रदिप झणझणे यांनी सांगितले.
जरी कोणी पैशाची मागणी केली तरी शिवसेनेकडे संपर्क साधावा म्हणजे जेणेकरून संबंधितावर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करता येतील किंवा लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करता येईल व जुल्मी-अन्यायाकारी पद्धतीस आळा घालुन चोख बंदोबस्त करता येईल.