महाराष्ट्र न्यूज फलटण : गणेश पवार
नाईक निंबाळकर देवस्थाने व इतर चॅरिटीज ट्रस्टच्या माध्यमातून भाविकांच्या सहकार्याने गेली सुमारे २५० वर्षाहुन अधिक काळ प्रतिवर्षी मार्गशीर्ष शु|| प्रतिपदा म्हणजे देवदिवाळी दिवशी लाखोंच्या उपस्थितीत भरणारी येथील श्रीराम रथोत्सव यात्रा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी आज परंपरागत पद्धतीने आदल्या दिवशी रथपूजन विधीवत करण्यात आले.
श्रीराम मंदिरा समोरील रथखान्यातून श्रीरामाचा परंपरागत रथ बाहेर काढून त्याची ट्रस्टी संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते विधीवत पूजा, आरती करण्यात आली, त्यावेळी श्रीराम कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीन शाहूराजे भोसले व सर्व मानकरी व नाईक निंबाळकर घराण्यातील मान्यवर उपस्थित होते.
आज मार्गशीर्ष शु|| १ (प्रतिपदा) म्हणजे देवदिवाळी दिवशी श्रीरामाचा रथ नगर प्रदक्षिणेस निघतो, तथापि यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रीराम रथ यात्रा रद्द करण्यात आली असल्याने रथ नगर प्रदक्षिणेस निघणार नाही, मात्र यात्रे दरम्यान असलेल्या विविध पूजा व अन्य विधी परंपरागत पद्धतीने होणार असून त्याचाच एक भाग म्हणून आज रथ पूजन करण्यात आल्याचे ट्रस्टच्या कार्यालयातून सांगण्यात आले आहे.



















" width="90" height="60">
" width="180" height="120">