खटाव –
खटाव- वडूज रस्त्यावर जाधव लवणा नावाच्या शिवारात सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास एसटी व दुचाकीचा भिषण अपघात घडला . एस टी बस आणि दुचाकीची समोरासमोर भिषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर (वय ३८) याचा जागीच ठार झाला. तर एसटीतील १५ प्रवाशी जखमी झाले.
मिळालेल्या माहितीनुसार खटाव कडून वडूजकडे निघालेली पुणे स्टेशन – वडूज ही एस टी बस ( एम एच ०६ एस ८१७५ ) व वडूज कडून खटाव कडे निघालेला दुचाकीस्वार ( यू के ०५ ए ५५५९) या दोघांमध्ये समोरा समोर भिषण धडक झाली.
या धडकेत दुचाकीस्वार गणेश तानाजी काटकर, रा कुकुडवाड, (ता माण ) जागीच ठार झाला. धडके नंतर बस पलिकडच्या झाडावर जाऊन आदळली. या धडकेत झाड अक्षरशः तुटून पडले. त्यामध्ये बसचे प्रचंड नुकसान झाले . बसचालक गंभीर असून बचावला आहे.. यावेळी येथील जाधव कुटुंबियांनी व उपस्थितांनी बसच्या चालकाला केबीनमधून बाहेर काढण्यासाठी तसेच जखमींना बसमधून बाहेर काढण्यासाठी मोलाची मदत केली.
तसेच घटनेची माहिती मिळताच पुसेगाव पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून वडूज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.