महाराष्ट्र न्यूज /लोणंद : लोणंद पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल व्यावसायिकांची लोणंद पोलीस ठाणे येथे आज बैठक घेण्यात आली.
सध्या हॉटेल व्यवसायिक यांना फोन वरून ऑर्डर सांगून बँक अकाउंट नंबर एटीएम/नंबर मागून होत असलेल्या ऑनलाईन फॉरवर्ड अनुषंगाने माहिती देण्यात आली. तसेच ऑनलाइन होत असलेल्या फसवणुकी बाबत काय दक्षता घ्यायची याबाबत लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विषाल वायकर यांच्यावतीने हॉटेल व्यवसायिकांनी काळजी घेणेबाबत आव्हान करण्यात आले. तसेच हॉटेल समोरील रोडवर सीसीटीव्ही कॅमेरा बसवणे बाबत ही सूचना देण्यात आले आहेत.
कोरोना विषाणू अनुषंगाने मा.जिल्हाधिकारी सातारा यांनी दिलेल्या नियमांचे पालन करणे बाबत सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सव अनुषंगाने कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबद्दल सूचना देण्यात आल्या.
यावेळी लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विषाल वायकर व उपनिरीक्षक गणेश माने त्याच बरोबर लोणंद परिसरातील हॉटेल व्यवसायिक उपस्थित होते.






















