जिल्हाधिकारी कार्यालय पुरावा घेण्यास टाळाटाळ
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी / माण :
जनावरांच्या चारा छावणीत माण खटाव तालुक्यात बिले अदा करणेत आलेल्या ६६ कोटींच्या रकमेत घोटाळा झाला असून या अनुषंगाने तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणांचा तपास सुरु आहे किंवा नाही याचा थांगपत्ता लागत नसून या तपासासाठी उपयुक्त असणारे आणी भ्रष्टाचार सिध्द करणारे पुरावे द्यायला तक्रारदार तयार असताना तसे लेखी कळवून देखील ते पुरावे घेण्यास जिल्हाधिकारी कार्यालयाची टाळाटाळ कशासाठी सुरु आहे आणी तपास करणेत जाणीवपूर्वक केला जात असलेल्या विलंबास कोण जबाबदार आहे याचा एकदाचा सोक्षमोक्ष मा.शेखरसिंह जिल्हाधिकार्यांनीच लावावा अशी सडेतोड मागणी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी केली आहे.
६६ कोटींची बिले अदा करणेकामी महसूलच्या अधिकार्यांनी घेतलेली टक्केवारीची रक्कम देखील कोटींच्या घरात असून याचा तपास होऊच नये असे वाटणारे जिल्हाधिकारी कार्यालयातील जबाबदार अधिकारी नेमके झारीतील शुक्राचार्य -व काणाला लागणारी कोण कोणआहेत ते एकदाचे जिल्हाधिकार्यांनी शोधणे गरजेचेच आहे कारण या प्रकरणाच्या तपासाला झालेल्या विलंबाचे मुख्य सूत्रधार देखील तेच बोलघेवडे आहेत हे आम्ही जाणून आहोत. अशांमुळेच भ्रष्टाचाराला खतपाणी मिळून तो बोकाळण्यास मदत झाली असून यामध्ये तालुका अधिकार्यांना पाठीशी घालण्याबरोबरच छावणी चालक,संस्था मालक म्हणजेच राजकीय मंडळी यांना वाचविण्यासाठीच तथाकथीत झारीतील शुक्राचार्यांचे हात ओले केले गेले आहेत काय?
याचादेखील तपास व्हायलाच हवाय अशी मागणी भोसले यांनी करतानाच ते पुढे म्हणाले की , जिल्हाधिकार्यांनी उशिरा का होईणा मला सर्व पुराव्यांसहित व्हाॅटस अॅप मेसेज करुन बोलावून घेणे हा त्यांचा डावपेच का असू नये कारण न भेटताच शेखरसिंह जिल्हाधिकारी सातारा यांनी स्वत: फोनवरुन मला लेखी सुचित करता येत नसलेचे म्हणजेच लेखी देऊ शकत नसलेचे सांगितलेवरुनच मी पुरावे सादर न करणे उचित समजत, पुरावेजन्य माहीती लेखी पत्रांद्वारे त्यांचे कार्यालयात दि:२३ डिसेंबर २०२० रोजी सादर केली असलेची माहीती भोसले यांनी यावेळी दिली आहे.
चारा छावणी व अवैध वाळू प्रकरणात पकडलेला ट्रक पकडला-सोडला आणी परत आणला या प्रकरणांबरोबरच भविष्यात संबंधित अधिकार्यांनी गैर मार्गाने उभा केलेल्या पैशांतून मिळविलेल्या मालमत्तांची सखोल चौकशी योग्य त्या संस्थांमार्फत करणेस भाग पाडूच असा सणसणीत ईशारा सरतेशेवटी संजय भोसले यांनी दिला आहे.






















