महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी :
लोणंद ता.खंडाळा येथील धोकादायक खड्डा लोणंद नगरपंचायतीचे नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील यांच्या निदर्शनास आला.यावर त्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृतिशील उपाय योजना करीत खड्डा बुजविन्याचे काम केल्याने नागरिकांनी नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केलेले आहे.
अहिल्यादेवी चौक, पुणे-सातारा रोडवर आणि पंढरपूर बाह्य वळणावर लोणंद मध्ये येताना उतारावर एक भलामोठा खड्डा पडला होता व तो प्रवाशांच्या जीवितास खूपच धोकादायक बनला होता.या खड्डयामुळे आतापर्यंत अनेक लोक टू व्हिलर गाडीवरून पडलेले आहेत.यातून अनेकांना गंभीर दुखापतीचा सामना करावा लागलेला आहे.
नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक हणमंतराव विनायकराव शेळके पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आली.त्यांनी स्वखर्चाने हा खड्डा बुजवण्याची तयारी दाखवली.नितीन ओव्हाळ कॉन्ट्रॅक्टर यांच्या बरोबर त्यांनी संवाद साधला व त्याच तत्परतेने ओव्हाळ यांनी नगरसेवक यांच्या सुचनेप्रमाणे हा खड्डा दुसऱ्याच दिवशी लगेच डांबर ,खडी व लागणारे सर्व साहित्य टाकून असे चार खड्डे बुजवले आणि भविष्यात होणारे धोके टाळले.
नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील हे कायम लोणंद मध्ये सामाजिक बांधिलकी जपत लोकहिताच्या दृष्टीने कार्य करीत असतात.कोरोनाच्या काळात ही त्यांनी केलेल्या कार्याची झलक समस्त लोणंदकरांनी अनुभवलेली आहे.संकटाच्या काळात धावून येणारे, जनतेसाठी दक्ष असणारा व मनाने मोठा असणारा धडपडीचा नगरसेवक म्हणून त्यांच्या कार्याकडे नेहमी पाहिले जाते आहे.तत्परतेने काम करणारे नगरसेवक हणमंतराव शेळके पाटील यांनी खड्डे बुजविण्यासाठी घेतलेला पुढाकार यामुळे त्यांचे विशेष कौतुक केले जाते आहे.