फलटण प्रतिनिधी = फलटण तालुक्यातील साखरवाडी मध्ये असणाऱ्या दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल शाळेमध्ये दिनांक0१/७/२०२२ रोजी साखरवाडी मध्ये जागतिक कृषी दिन व जागतिक डॉक्टर्स दिन उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या प्रिन्सिपल अंजली मॅडम उपस्थित होत्या . कृषी दिनानिमित्त व डॉक्टर दिनानिमित्त विद्यार्थी शेतकऱ्यांच्या वेशभूषेत व डॉक्टरच्या वेशभूषेत तयार होऊन आले होते कार्यक्रमाची सुरुवात वृक्षदिंडी झाली त्यानंतर प्रमुख पाहुणे शाळेच्या प्रिन्सिपल अंजली मॅडम यांनी वसंतराव नाईक यांना अभिवादन करण्यात आले तसेच शाळेचे शिक्षिका सविता मॅडम यांनी वसंतराव नाईक व आजचा शेतकरी या विषयावर भाषण केले त्यानंतर मुलांनी शेतकरी शेतामध्ये कसा राबतअसतो सर्वप्रथम शेतामध्ये खांदणी पेरणी उभारणी कशी केली जाते ते आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीतून विद्यार्थ्यांनी सादर केले जसा आजच्या काळामध्ये शेतकरी अन्नदाता म्हणून महत्त्वाचे काम करतो तसेच डॉक्टर्स सुद्धा मनुष्याचे जीवन वाचवण्याचे महत्त्वपूर्ण असे काम करतो हे विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवेगळ्या कलागुणातून सादर केले घाम गाळून काया मातीत पिकवतो मोती जगाचा पोशिंदा स्वतःला म्हणवितो या वाक्याचे स्पष्टीकरण देत शाळेच्या शिक्षिका स्नेहल पवार यांनी शेतकरी विषयी अमूल्य अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली अशा प्रकारे जागतिक कृषी दिन व जागतिक डॉक्टर्स दिन साजरा करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमास उपस्थित शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली दत्तात्रय शिंदे,शाळेच्या इन्चार्ज शितल कुंभार, शिवगंगा पवार, सविता जगताप, स्नेहल पवार,माधुरी वाघमारे, सुषमा गायकवाड उपस्थित होते. दि एम्रल्ड हाईट्स इंटरनॅशनल स्कूल साखरवाडी