कराड : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. केंद्राकडून आज विविध घोषणा करण्यात आल्या आहेत. मात्र या अर्थसंकल्पातून शेती व शेतकऱ्यांसाठी निराशाजनक असल्याची नाराजी शेतकरी मित्र अशोकराव थोरात यांनी केली आहे.
अशोकराव थोरात म्हणाले, शेतकरी आंदोलने व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बड्या शेतकऱ्यांना दिलासा म्हणून आधारभूत किंमतीचे गाजर दाखविले आहे. वास्तविक अर्थसंकल्पामध्ये शेतीमाल तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा, वीज, पाणी, ग्रामीण रस्ते, बियाणे ,खते व बाजार व्यवस्था यासाठी वेगळी तरतूद करून सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर यांच्यासाठी काहीही वेगळे केलेले नाही. ते जाहीर केले आहे, तेही पुढील वर्षात 100 टक्के उपलब्ध होईल केले जाईल का?तर त्याचेही उत्तर नकारार्थीच असेल, अशीही नाराजी व्यक्त केली.