माझी वसुंधरा स्पर्धेतील यश हे सर्व कराडकरांचे सांघिक यश आहे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांची प्रतिक्रीया पालिकेत कर्मचाऱ्यांचा जल्लोष.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : माझी वसुंधरा स्पर्धेतील यश हे सर्व कराडकरांचे सांघिक यश आहे. नगरपालिकेच्या सर्व संकल्पनांना नागरिक, महिलांनी प्रतिसाद दिला. विविध सामाजिक, पर्यावरणप्रेमी संघटनांनी मोठे योगदान दिले. पर्यावरणप्रेमी नागरिकांनीही सक्रीय सहभाग घेतला. नगरपालिकेचे तत्कालीन पदाधिकारी, सर्व नगरसेवक, पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांचे सहकार्य लाभल्याने पालिका या स्पर्धेत अव्वल आली असल्याची प्रतिक्रिया मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी “वेधमाझा’ शी बोलताना दिली आहे .
गेल्या दोन वर्षांपासून केंद्राच्या स्वच्छ सर्वेक्षणच्या धर्तीवर माझी वसुंधरा अभियान सुरू केले. मात्र केवळ स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन इतकाच उद्देश न ठेवता वातावरणीय बदलांना लक्षांत घेऊन पृथ्वी, आकाश, जल, वायू आणि अग्नी या पंचतत्वावर आधारित निसर्गाशी पूरक जीवनपद्धती राबवण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू करण्यात आले आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची ही संकल्पना आहे. या स्पर्धेसाठी 5 हजार गूण होते. यात कराड पालिकेच्या उपक्रमांच्या प्रत्यक्ष पाहणीत 2460 आणि डॉक्युमेंटेशनमध्ये 2430 असे 5000 पैकी 4890 गुण पालिकेला मिळाले. त्यामुळे पालिका राज्यात प्रथम क्रमांकावर आली गेल्या वर्षभरात वृक्षारोपण वृक्षसंवर्धन, हरीत क्षेत्राचा विकास, वृक्षसंवर्धनासाठी राबवलेले उपक्रम, धूळ कमी करण्यासाठी कारंजांची निर्मिती, जलसंवर्धन, नदीस्वच्छता, नदीकाठच्या पर्यावरण जतनासाठी प्रयत्न, अर्बन फॉरेस्ट अशा विविध संकल्पना पालिकेने राबवल्या. शहरामध्ये वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोठय़ा प्रमाणात झाले आहे. त्यामुळे शहरातील विविध ठिकाणे ऑक्सिजन झोन बनत आहेत. दरवर्षी मोठय़ा प्रमाणात वृक्षांची लागवड व जनजागृती यामुळे प्रोत्साहन मिळाल्याने कराड पालिकेबरोबरच एनव्हायरो नेचर क्लब तसेच अनेक संस्था, नागरिक या वृक्ष संवर्धन चळवळीत सहभागी झाल्या आहेत. इदगाह मैदानातील 6 एकर जागेत वृक्षारोपण करण्यात आले आहे. शहरात पर्यावरणासंबंधित करण्यात आलेली जनजागृती तसेच ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेतील सर्व निकषांमध्ये कराड पालिका उत्तीर्ण झाल्याने कराडने नगरपारिषद गटात पालिकेला राज्यात प्रथम क्रमांक पटकावता आला. कराड पालिका कर्मचाऱयांचा जल्लोषआज सकाळी मुख्याधिकारी डाके यांची पालिकेत एन्ट्री होताच त्यांच्यावर फुलांची उधळण करण्यात आली त्याच फुलांनी डाके यांनी कर्मचाऱ्यांनाही न्हाऊ घातले व या विजयाचे सगळे श्रेय कर्मचारी वर्गाचे असल्याचे सांगितले यावेळी मुख्याधिकारी डाके यांचा जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला… डाके यांनीदेखील कर्मचारी अधिकारी वर्गाचा यथोचित सत्कार केला.त्यानंतर सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने डी जे च्या तालावर गुलालाची उधळण करत विजयाचा जल्लोष केला