महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : बारामती
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखाना तालुका बारामती जिल्हा पुणे जिल्हा सण २०२०-२०२१ चा गाळप हंगाम आतापर्यंत यशस्वीरित्या पार पडला आहे, असे कारखान्याचे चेअरमन पुरूषोत्तम जगताप यांनी सांगितले ते पुढे म्हणाले आतापर्यंत सोमेश्वर कारखान्यांने पाच लाख 42 हजार मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे यावर्षी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये भरपूर पाऊस झाल्यामुळे सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात जवळपास १२ लाख ७५ हजार मे.टन ऊस उपलब्ध होईल असे ते म्हणाले, सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची प्रति दिन गाळप क्षमता ही पाच हजार मेट्रिक टन आहे परंतु कारखाना सुरु झाल्यापासून आतापर्यंत कारखाना प्रतिदिन सहा हजार ते सहा हजार तीनशे मेट्रिक टन प्रति दिन उसाचे गाळप करत आहे.
आज कारखान्यासमोर अतिरिक्त उसाची समस्या आहे, त्याच्यावर मार्ग काढण्यासाठी संचालक मंडळ प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले आज अखेर ५,४२,८०० मे.टनाचे गाळप झाले असून जवळपास अजून ७.५० ते ८ लाख मे.टनाचे ऊस गाळप होणे अपेक्षित आहे. अतिरिक्त ऊस नेण्यासाठी जवळपासच्या कारखाना प्रशासनाशी पत्रव्यवहार केलेला आहे त्यानुसार अतिरिक्त ऊसाच्या प्रश्ना संदर्भात च्या समस्या सोडवण्यासाठी त्याचा उपयोग होईल असेही ते म्हणाले, परंतु जवळपासच्या कारखाना प्रशासनाकडून आपल्या जवळचा अतिरिक्त ऊस नेण्यासाठी कोणत्याही प्रकारचा निर्णय अजून घेण्यात आलेला नव्हता कारण त्या कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात भरपूर वर उपलब्ध आहे आणि तो स्वस्त मिळतो परंतु पुणे जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये सोमेश्वर कारखान्याची २८०८ एफ आर पी आहे ती जिल्ह्यात अव्वल आहे असे मत कारखान्याचे चेअरमन जगताप यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सल्ल्यानुसार व चेअरमन ,संचालक मंडळाच्या निर्णयानुसार सभासदांच्या खात्यावर एक रकमी एफ आर पी २८०८ रुपये आता आपण जमा करत आहोत असे ते म्हणाले.
अतिरिक्त उसाची समस्या सोडवण्यास संदर्भात सोमेश्वर कारखान्याचे संचालक मंडळ व चेअरमन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटले व अजित पवार यांनी संचालक मंडळाला यातून मार्ग काढण्याचा शब्द दिला. त्यानुसार दौंड शुगर व जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी अतिरिक्त ऊस नेण्यास मान्य केले आहे त्यानुसार दौंड शुगर व जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या थोडी आपल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात काही थोड्या दिवसातच पडतील असेही जगताप यांनी सांगितले. अतिरिक्त ऊस या संदर्भातील समस्या या दोन कारखान्यांमुळे सुटल्यामुळे सभासदांना नक्कीच याचा दिलासा मिळेल असेही त्यांनी मत व्यक्त केले त्याचबरोबर सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असल्यामुळे मे महिन्यात गाळप करणे कारखान्याला न परवडणारे आहे आणि अनेक समस्यांना निर्माण होऊ शकतात यामध्ये ऊस तोड मजूर ऊन असल्यामुळे ऊस तोडण्यासाठी त्यांची मानसिकता नसते तसेच त्याचा रिकव्हरी वरही परिणाम होतो व रिकव्हरी कमी बसते.
सण २०२१-२२ हंगामाकरिता ३४००० हजार एकराची नोंद झाली आहे तसेच पुढील हंगामाकरिता ३८ ते ४० हजार एकरापर्यंत नोंद होईल असा अंदाज जगताप यांनी व्यक्त केला आहे आणि त्यामुळे अंदाजे १६ ते १८ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध होईल म्हणून या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ व चेअरमन यांनी कारखान्याची विस्तारवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे सध्या कारखान्याचा गाळप क्षमता ही आज पाच हजार मेट्रिक टन प्रतिदिन असून तो प्रतिदिन साडेसात हजार मेट्रिक टन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याच प्रमाणे पुढील हंगाम चालू होईपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा मानस आहे त्याचबरोबर यासाठी ऊस तोडणी मजूर कामगार वाहतूकदार सभासद बंधू यांच्या मार्गदर्शनामुळे व वेळोवेळी सहकार्य मिळत राहिले आणि पुढे मिळत राहील त्याचबरोबर सोमेश्वर सहकारी साखर कारखाना राज्यात एक नंबर चा करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून आपण वाटचाल करत आहोत असे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी व्यक्त केली