महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय फलटण येथील राधिका विलास रणवरे या कृषीकन्येने फलटण तालुक्यातील जिंती गावात ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (RAWE) सन २०२१-२०२२ अंतर्गत शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक रित्या मोलाचे मार्गदर्शन केले.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम स्वतःच्या गावात राबविला जात आहे त्यामुळे त्या त्या गावातील शेतकऱ्यांना तेथील विद्यार्थी प्रशिक्षित करत आहेत. यामध्ये जनावरांचे लसीकरण, बीज प्रक्रिया, गांडूळ खत निर्मिती, फळझाडांमधील खत व्यवस्थापन, झीरो एनर्जी कूल चेंबर बनवणे, निंबोळी अर्क तयार करणे आणि विविध मोबाईल ॲप्स च्या माध्यमातून शेतमालाची खरेदी विक्री इत्यादी विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
सर्व प्रात्यक्षिके कोरोना स्थितीचा आढावा घेऊन व नियमांचे पालन करून करण्यात आले.त्यातील फळझाडांमधील खत व्यवस्थापन या प्रात्यक्षिक दरम्यान महादेव रणवरे, अरुण रणवरे, चैतन्य रणवरे, केतन रणवरे, अलका पवार, निलम पवार, छाया रणवरे, सुनंदा रणवरे, विद्या पवार, खातुन तांबोळी, मर्जिना तांबोळी, अनिस अतार आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. प्रसंगी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक निवारण करण्यात आले.
फलटण एज्युकेशन सोसायटीचे, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, प्रा. एन. एस. धालपे, प्रा. एस. वाय. लाळगे यांचेही यावेळी मार्गदर्शन लाभले.