महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील सर्व शेतकरी व जनावरांना हक्काचे पाणी वर्षभर पुरवण्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी तरंगवाडी तलावासह इतरही तलाव पूर्ण क्षमतेने भरण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे तरंगवाडी तलाव ६०% भरला आहे. तो तलाव पूर्ण क्षमतेने भरणार असल्याची ग्वाही इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे यांनी दिली .
तरंगवाडी तलावात जलपुजन कार्यक्रमाच्या प्रसंगी मधुकर भरणे म्हणाले कि, परिसरातील शेतकरी वर्गाची तलावात पाणी सोडण्याची सातत्याने मागणी होती, यानुसार पाणी सोडले आहे. आवर्तन सुरू आहे. त्यामुळे शेतकरी यांनी चिंता करण्याची गरज नाही.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे , नवनाथ डाकेे, नितीन गोपने, डाॅ. दादाराम झगडे, महारनवर गुरुजी, दिलिप भोंग आदी मान्यवर व शेतकरी वर्ग उपस्थित होता.