चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच. तब्येत खालावल्याने भानुदास डाईंगडे रूग्णालयातउपजिल्हा रूग्णालय आंदोलनाला समाजातुन उत्सफुर्त पाठिंबा
भानुदास डाईंगडे यांची तब्येत खालावल्याने रूग्णालयात नेताना सागर शिवदास, सतीश माने व आरोग्य कर्मचारी.
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : चौथ्या दिवशीही उपोषण सुरूच. उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोयी दुर कराव्यात या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी सुरू केलेले उपोषण रविवारी चौथ्या दिवशीही सुरूच हाते. उपोषणकर्ते भानुदास डाईंगडे यांची तब्येत खालावल्याने रविवारी दुपारी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रूग्णालय हा गोरगरीब व सर्व सामान्य रूग्णांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने समाजातील विविध स्तरातुन प्रहारच्या आंदोलनास उत्सफुर्त पाठिंबा मिळत आहे. कराडच्या सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रूग्णालयातील रिक्त डॉक्टरांची पदे भरावीत, एमआरआय मशिन, सिटीस्कॅन मशिन व तज्ञ उपलब्ध करावेत, रेडीओलॉजिस्ट उपलब्ध करावा, ट्रामा केअर सेंटर सुरू करावे, 200 बेडचे रूग्णालय मंजुर करावे, डायलेसीस स्टाफ व वर्ग 4 ची पदे भरावीत आदी मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मनोज माळी व भानुदास डाईंगडे यांनी गुरूवारपासुन उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रवेशव्दारात अमरण उपोषण सुरू केले आहे. रविवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी उपोषणकर्ते भानुदास डाईंगडे यांची तब्येत खालावल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालयातच दाखल करण्यात आले आहे. तर मनोज माळी अध्याप आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत उपजिल्हा रूग्णालयातील गैरसोई दुर होऊन गोगरीब रूग्णांना उपचार मिळत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मनोज माळी यांनी व्यक्त केला आहे.
कराडसह, पाटण व कडेगाव तालुक्यातील गोगरीब रूग्णांच्या दृष्टीने अत्यंत महात्वाच्या असलेल्या उपजिल्हा रूग्णालयाकडे लोकप्रतिनिधी, शासन व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोठयावधी रूपयांचा निधी खर्चुनही रूग्णांना उपचार मिळत नाहीत.. त्यामुळे मनोज माळी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला कराड शहरासह तालुक्यातुन मोठा पाठिंबा मिळत आहे. कुठल्याही परीस्थीतीत उपजिल्हा रूग्णालयाची परीस्थीती बदलायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपोषणास वर्धन ऍग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम, माजी जिल्हा परीषद सदस्य सागर शिवदास, निवास थोरात, शिवसेनेचे शहर प्रमुख शशीराज करपे, नितीन ढेकळे, यशवंतराव मोहिते कृष्णा कारखाण्याचे संचालक दयानंद पाटील, रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाअध्यक्ष अनिलबापू घराळ, सैदापुरचे सरपंच फत्तेसिंह जाधव, मुरलीधर जाधव, मनसेचे तालुका अध्यक्ष दादासाहेब शिंगण, अक्षय गवळी, शेखर बर्गे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत मदने, अमित पाटील, भिमआर्मीचे जिल्हाअध्यक्ष जावेद नायकवडी, दादासो चव्हाण, कृष्णा चव्हाण, अमोल माळी, निसार मुल्ला, साजीद मुल्ला, इम्रान मुल्ला, नरेंद्र लिबे, समीर कुडची, अधिक सुर्वे, हनीफ शिकलगार, तानाजी पिसाळ यांच्यासह तालुक्यातील अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी व ग्रामस्थांनी या आंदोलनास पाठींबा दिला आहे.