ग्रामपंचायतीकडून आगार व्यवस्थापनाला निवेदन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : शाळा -कॉलेज सुरू झाली तरी कराड कारवे कोरेगाव एसटी सुरू न झाल्याने विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे एसटी सुरू नसल्याने पालक विशेषता विद्यार्थिनींना कॉलेजला पाठवत नाहीत शिवाय खाजगी वाहनांची ही सोय नाही त्यामुळे कराड आगाराने कोरेगाव एसटी लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून केली आहे.
दरम्यान कराड आधाराने ठराविक गावातच एसटी सेवा सुरु केली आहे अनेक गावात अद्याप एसटी पोहोचलेली नाही कोरेगाव कराडपासून जवळपास सात किलोमीटर अंतरावर आहे कारवे व कोरेगाव येथून शिक्षणासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात कराड शहरात येत असतात मात्र एसटी बंद असल्याने आणि खाजगी प्रवासी वाहतुकीची सोय नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे
मागील दहा महिन्यांपासून कराड कार्वे कोरेगाव एसटी बंद आहे शाळा-कॉलेज ही बंद होती बाजारपेठ बंद होत्या कोरूना चा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत असताना शाळा कॉलेज सुरू झाले आहेत सुरुवातीला आठवी ते बारावी चे वर्ग सुरू होते पण आता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत ग्रामीण भागातून शिक्षणासाठी कराड शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी आहे
एसटी नसल्याने पालक विद्यार्थिनींना कॉलेजला पाठवत नाही दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायती कडून कराड सागराशी पत्रव्यवहार करून एसटी सुरू करण्याची विनंती केली आहे मात्र अद्याप या पत्राची दखल व्यवस्थापनाने घेतलेली नाही पगार व्यवस्थापनाने याची तात्काळ दखल घेऊन कोरेगाव एसटी सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.