लोणीभापकर प्रतिनिधी संजय कुंभार
न्यू इंग्लिश स्कूल लोणीभापकर येथे दिनांक 26 रोजी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. ही पालक सभा शाळा सुरू करण्याबाबत होती.यामध्ये शाळेने आणि पालकांनी तसेच ग्रामपंचायत ने कोणती काळजी घ्यायची या मुद्द्यांवर ही सभा घेण्यात आली. लोणी भापकर येथील पालकांनी शाळेला आवश्यक असणाऱ्या वस्तू लोकवर्गणीतून वैयक्तिक स्वरूपात देण्याचे कबूल केले. 2जुलै पासून इयत्ता नववी दहावी व बारावी चे वर्ग चालू करण्याचा निर्णय घेण्यात आला ,तसेच 1 ऑगस्ट पासून पाचवी ते आठवी आणि अकरावी हे उर्वरित वर्ग चालू करण्यात येणार आहेत .शाळा सुरू होण्यापूर्वी सर्व वर्गखोल्या तसेच शाळेचा सर्व परिसर हायपो क्लोराईड या लिक्विड चा वापर करुन फवारणी करून घेण्यात येणार आहे .यामध्ये शाळा चालू झाल्यानंतर पालकांनी आणि शाळेने मुलांची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे त्यांना शाळेत लावताना तोंडाला मास्क लावलेले असावे त्याचबरोबर शाळेत आल्यानंतर सॅनिटायझर व हात धुण्यासाठी साबण यांची सोय केलेली आहे.
यावेळी शाळा संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब भापकर सहसचिव विजयसिंह भापकर पंचायत समिती सदस्य राहुल भैया बापकर नीरा मार्केट सभापती मुरलीधर ठोंबरे लोणी भापकर चे सरपंच रवी काका भापकर पळशी चे सरपंच रावसाहेब चोरमले सायंबाचीवाडी सरपंच प्रमोद जगताप शाळेचे मुख्याध्यापक संदीप जगताप व शिक्षक शिक्षिका व इतर कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.























