मसूरः एमडी ला प्रवेश मिळावण्साठी अनेकांचा आटापिटा असतो परंतु ग्रामीण जनतेच्या सेवेसाठी डॉ.रमेश लोखंडे यांनी प्राथमिक आरोग्य निवडले वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून डॉ.लोखंडे कुटुंबीयांनी मसूर परिसरातील जनतेची केलेली प्रामाणिक विनम्र आरोग्य सेवा इतरांना दिशादर्शक असून सर्व घटकाला न्याय देताना कोरोना महामारी काळातही त्यांनी मोलाचे योगदान दिल्याचे सांगून मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केले.
मसूर ता कराड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.रमेश लोखंडे यांच्या सेवानिवृत्ती गौरव समारंभ प्रसंगी अध्यक्षपदावरून ना.पाटील बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खा.श्रीनिवास पाटील शिक्षण व अर्थ समितीचे सभापती मानसिंगराव जगदाळे, सभापती प्रणव ताटे, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार जगदाळे, माई चारीटेबल ट्रस्टच्या सौ. संगीता साळुंखे, सह्याद्रीचे संचालक लालासाहेब पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे अजय गोरड यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा.श्रीनिवास पाटील म्हणाले इतकी वर्षे एकाच ठिकाणी प्रदिर्घ सेवा करण्याची संधी मिळणे ही डॉ.लोखंडे यांच्या कामाची रास्त पोहोच आहे विनम्र तक्रार अव्याहत सेवा देणे ही समाजप्रिय असल्याचं लक्षण असून त्यांच्या आरोग्यसेवेचा ठसा दीर्घकाळ स्मरणात राहील भविष्यातही त्यांनी लायन्स क्लब बरोबरच स्वतःच्या दवाखान्यात सेवाभावी वृत्तीने कार्यरत रहावे.
सत्कारास उत्तर देताना डॉ.रमेश लोखंडे यांनी सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून स्वतःच्या गावात 21 वर्ष सेवा करता आली ही भाग्याची गोष्ट असून आरोग्य केंद्राला अनेक पारितोषिके मिळाली ही चांगल्या कार्याची पोचत होती. आजवर 5000 कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, 7000 बिगर मृत्यू प्रसूती पल्स पोलिओ मोहिम पंधरा हजार लोकांचे कोविड तसेच 18000 कोव्हाॕक्सिन लसीकरण टप्पा पूर्ण करून 13000 कोरोना टेस्ट केल्या माझ्या सेवाकार्यात मसूर भागातील जनतेने मोलाची साथ दिली असे सांगून सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे व कोणाच्याही वाट्याला आजार व दुःख येऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी नंदकुमार जगदाळे, सौ.संगीता साळुंखे, मानसिंगराव जगदाळे, दिलीप पाटील यांनी आपल्या भाषणात डॉ. लखंडे यांच्या सेवाभावी कार्याची प्रशंसा केली.प्रारंभी मानपत्राचे वाचन मोहन सासवडे यांनी केले.
मसूर परिसरात वैद्यकीय सेवेतील विश्वासाचा डॉक्टर म्हणून डॉ.रमेश लोखंडे यांनी विस्मरणीय सेवा दिली डॉक्टर व्यवसायातील बाजारीकरण ही गंभीर बाब असून डॉक्टर कसा असावा त्याचे डॉ.लोखंडे हे मूर्तिमंत उदाहरण आहेत गेली एकवीस वर्ष अविरत प्रदीर्घ सेवा मसूर येथे करून सेवानिवृत्तही मसूरमध्येच झाले हा दुग्धशर्करा योग असून त्यांच्या बिनतक्रार सेवेमुळेच त्यांना बदलीसाठी कुठेही प्रयत्न करावे लागले नाहीत असे अजितराव पाटील यांनी स्पष्ट केले.
सूत्रसंचालन राजेश शहा व डॉ.अनघा राजगुरू यांनी केले प्रास्ताविक सरपंच पंकज दीक्षित, यांनी केले स्वागत उपसरपंच विजयसिंह जगदाळे व डॉ.प्रथमेश लोखंडे यांनी केले. आभार सदाशिव रामुगडे यांनी मानले.
यावेळी भाऊसाहेब चव्हाण, बच्चूभाई शहा, आर पी साळुंखे, अनिल जेधे, दिलीपराव लंगडे, तुषार पवार, विश्वनाथ पुरोहित, प्रकाश ओसवाल, नितीन भाटे, विनोद शहा, उमेश लोखंडे, डॉ.राजेंद्र यादव, प्रकाश माळी, दिनकर शिरतोडे, डॉ.अभिषेक दुबल, डॉ.सुभाष पाटील, डॉ.सतीश देशमुख, डॉ.धर्माधिकारी, डॉ.प्रकाश शिंदे, यासह राजकीय सामाजिक विविध संस्थांचे पदाधिकारी वैद्यकीय सेवेतील पदाधिकारी ग्रामस्थ महिला व आरोग्य सेवक उपस्थित होते.