बारामती ता.०९-: कु. प्रियंका हरिश्चंद्र गवळी, महिला व बाल विकास अधिकारी महाराष्ट्र शासन तालुका वाशिम जिल्हा वाशिम यांना यंदाचा प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘नवदुर्गा सन्मान’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
सुनील निंबाळकर, बारामती प्रतिनिधी...
प्रियंका हरिश्चंद्र गवळी, या महिला व बाल विकास अधिकारी, महाराष्ट्र शासन, म्हणुन ता.वाशिम ,जि. वाशिम या ठिकाणी कार्यरत आहेत प्रियंका गवळी यांचे मुले कुपोषण मुक्त होण्यासाठी त्या स्वखर्चातून विशेष प्रयत्न करतात, त्याचप्रमाणे निराधार व्यक्तींसाठी गृह उभारणी, सामाजिक कार्याबद्दल अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी काही मुले कुपोषण मुक्त होण्यासाठी दत्तक घेतलेले आहेत.त्यांच्या या विविध प्रकारच्या सामाजिक कामाचा आढावा लक्षात घेऊन त्यांना यंदाचा "नवदुर्गा सन्मान पुरस्कार"जाहीर झाला आहे असे मत कु. प्रियंका गवळी यांनी महाराष्ट्र न्यूज शी बोलताना व्यक्त केले.
दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिन असल्याने याच्या निमित्ताने या समारंभाचे आयोजन केले आहे. महाराष्ट्र आयोजित हा विशेष समारंभ राज्यस्तरीय नवदुर्गा सन्मान सोहळा कवी केशवसुत स्मारक, मालगुंड- गणपतीपुळे, जिल्हा रत्नागिरी. या ठिकाणी रविवार ०७ मार्च २०२१ रोजी दुपारी ०१ ते सायंकाळी ०४ वाजता हा समारंभ कोविडचे तसेच सोशल डिस्टन्स पाळून समारंभ पार पडणार आहे असे आयोजकांनी सांगितले.