पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी :
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त जळगाव येथील विज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारी अग्रगण्य संस्था नोबेल फाउंडेशन आणि श्रम साधना ट्रस्ट चे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी बांभोरी यांच्यातर्फे राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत . विज्ञान क्षेत्रात उत्तम कार्य करणाऱ्या शाळा शिक्षक आणि विद्यार्थी अशा तीन गटात पुरस्कारांची घोषणा राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या पूर्वसंध्येला पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्र.कुलगुरू डॉ.पी.पी.माहुलीकर यांनी केली .
शाळा गटात राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा पुरस्कार कराड जिल्हा सातारा येथील सरस्वती विद्या मंदिर या शाळेला जाहीर झाला आहे.बारामती येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन आणि जळगाव येथील विवेकानंद प्रतिष्ठान संचलित शानबाग विद्यालय यांना राज्यस्तरीय नोबेल विज्ञान प्रेरणा या पुरस्कारासाठी द्वितीय सन्मान मिळालेला आहे .
तर शिक्षक गटासाठी दिला जाणारा डॉ . सी.व्ही.रमण विज्ञान शिक्षक पुरस्कार भुसावळ येथील के नारखेडे विद्यालयाचे विज्ञान शिक्षक भानुदास जोगी यांना जाहीर झाला असून मालेगाव येथील कै ल.रा.काबरा विद्यालयाचे महेश बागड आणि सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील पिंपोडे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या शिक्षिका उर्मिला नाचन यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात येणार आहे . याप्रसंगी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष बचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ . पी . पी . माहुलीकर , निवृत्त प्राध्यापक डॉ . एस.व्ही.सोमवंशी कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सहाय्यक अधिष्ठाता डॉ संजय शेखावत , एसएसबीटी चे डॉ किरण पाटील , शिक्षक रामचंद्र पाटील , स्त्रीरोग तज्ञ डॉ संदीप पाटील , शिक्षक अतुल पाटील , नोबेल फाउंडेशनचे अध्यक्ष जयदीप पाटील व्यवस्थापक राजेंद्र पाटील उपस्थित होते . या पुरस्काराबददल स्कूल कमेटी,ग्रामस्थ मंडळ पिंपोडे बु,व विविध स्तरातुन अभिनंदन होत आहे.






















