फलटण प्रतिनिधी – सध्या फलटण शहर व तालुक्यातील अनेक गावात कोविड 19 चे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून या मध्ये वयस्कर वृद्ध व्यक्तींची संख्या आढळून येत आहे. दरम्यान अशा व्यक्तींना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर लगेचच डॉक्टर त्यांच्या नातेवाईकांना रेमडीसिविर इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगत आहेत. मात्र रेमडीसीविर इंजेक्शन फलटण मधील कोणत्याही मेडिकल स्टोअर्स मध्ये सहजासहजी उपलब्ध होताना दिसत नाही.या मुळे फलटण मध्ये रेमडीसीविर इंजेक्शन चा कृत्रिम तुटवडा जाणूनबुजून केला जात आहे.?असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडला आहे.दरम्यान प्रशासनाने रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अभिजित सूर्यवंशी(बेडके)यांनी प्रशासनाला केली आहे.
या बाबत जिल्हा/तालुका प्रशासन व अन्न व औषध प्रशासन अधिकारी सातारा यांनी तातडीने दखल घ्यावी व फलटण शहरातील मेडिकल स्टोअर्स यांना रेमडीसीविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. सूचना कराव्यात ही विनंती तसेच या रेमडीसीविर इंजेक्शन च्या सध्या मेडिकल स्टोअर्स मधील साठ्या बाबत फलटण मधील पुरवठा विभाग अनभिज्ञ झाला असून अगोदरच एवढी महागाईची इंजेक्शने देणे आर्थिक अडचणीत अवघड होत आहे. तर त्यासाठी पैशांची जुळवाजुळव केलीच तर ती सहजासहजी उपलब्ध होत नाहीत. या मुळे लोकांच्यात नाराजी पसरली असून या कडे आता जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अन्यथा प्रशासनाच्या विरोधात खूप मोठा संघर्ष करावाच लागेल अशी मानसिकता अनेकांची झाली असून रुग्णांच्या नातेवाईकात चीड निर्माण झाल्यास फलटण मध्ये आगडोंब उसळेल व याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहणार आहे.
सातारा जिल्ह्यात कोविड 19 रुग्णांचा आकडा 25 हजारांच्या पुढे गेला आहे. तर फलटणचा कोविड 19 च्या रुग्णांचा आकडा 3 हजारांच्या दिशेने गेला आहे. त्या तुलनेत आरोग्य यंत्रणा उभी नसल्याचे चित्र फलटण मध्ये पाहायला मिळत आहे. मात्र तरीही लोक प्रशासणावरती अवलंबून न राहता खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. तर या ठिकाणचे महागडे उपचार महागडी औषधे ct स्कॅन,लॅब टेस्ट,यांची बिले ऐकून नातेवाईक अक्षरशः थक्क होत आहेत. दरम्यान रुग्ण वाचवण्यासाठी कोण सोने गहान ठेवतोय कोण सोने मोडतोय,कोण कर्ज काढतोय कोण व्याजाने पैसे घेतोय या मुळे रुग्णां बरोबर नातेवाईक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत.ते रेमडीसीविर इंजेक्शन मुळे त्याचा कमीतकमी सहा इंजेक्शन चा डोस द्यावा लागत आहे. मात्र त्याची उपलब्धता होतच नाही. या मुळे दिवसभर नातेवाईकांना या मेडिकल स्टोअर्स मधून त्या मेडिकल स्टोअर्स मध्ये हेलपाटे मारावे लागत आहे. मात्र तरीही उपलब्ध होत नाहीत ही फलटण करांची मोठी शोकांतिका आहे.असे अभिजित सूर्यवंशी(बेडके)यांनी व्यक्त केली आहे.
या वेळी बोलताना अभिजित सूर्यवंशी(बेडके)यांनी सांगितले की फलटण तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनत असताना आरोग्य विभाग व अधिकारी कोविड 19 च्या रुग्णांच्या नातेवाईकांना उलटसुलट उत्तरे देत आहेत. या बाबत आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. आमची आरोग्य प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्या रुग्णांच्या नातेवाईकांना थोडं समजून घ्या,त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करा अगोदरच कुटुंबातील सदस्य कोविड 19 पॉझिटिव्ह आल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असते त्यातच त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे ते हतबल होत असतात अशा वेळी त्यांना समजून घ्या व योग्य ते उपचारासाठी दाखल करून घेत त्यांना मानसिक आधार द्यावा अशी मागणी अभिजित सूर्यवंशी (बेडके)यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केले आहे.