रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय राष्ट्रीय महिला आयोग नवी दिल्ली यांच्या अनुदानातून नात्यातील गैरवर्तनाची ओळख आणि कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. राष्ट्रीय पातळीवरील या चर्चासत्रासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शोभा कोकितकर, मनीषा तुळपुळे,रश्मी कारले डॉ.पद्मजा सामंत यांनी मौलिक मार्गदर्शन केले. स्त्रियांचे प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार, स्वरूप, कायद्याने स्त्रियांना मिळालेले संविधानिक अधिकार इत्यादी विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.सदर चर्चासत्राचे उद्घाटन महाविद्यालय विकास समिती सदस्य भावना घाणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. तर समारोप समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणुन प्रभारी प्राचार्या डॉ.शुभदा नायक उपस्थित होत्या.डॉ.
सॉलोमन यांच्या विशेष प्रयत्नातून यानराष्ट्रीय चर्चासत्रासाठी महिला आयोग नवी दिल्ली यांच्याकडून विशेष अनुदान प्राप्त झालेले होते. प्राचार्य डॉ पी.जी. पवार यांच्या विशेष मार्गदर्शनातून सदर चर्चासत्र संपन्न झाले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी डॉ.ओहोळ,डॉ. महाले,प्रा. घोरपडे यांनी विशेष परिश्रम घेतले.समन्वयक डॉ. स्मिता तांदळे यानी अहवाल वाचन केले.डॉ. विलास महाले यांनी आभार मानले.डॉ. राहुल पाटील,डॉ.विद्या नावडकर,डॉ. सुजाता पाटील यांनी सूत्रसंचालन केले.सदर राष्ट्रीय चर्चासत्रासाठी जास्तीत जास्त विद्यार्थी तसेच अभ्यासकांनी उपस्थित राहून चर्चासत्राचा आस्वाद घेतला.