महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
बावधन ओढा ते बावधन जाणाऱ्या दिड कि . मी लांब असलेल्या या रस्त्याची गेली कित्येक वर्षा पासुन चाळण होऊन त्यात फुट ते दिड फुटांचे खड्डे पडल्याने वाहन चालकांन सह पादचार्यांना कसरत करत अंतर कापावे लागते
बावधन ता वाई हे वाई तालुक्याच्या पटलावर राजकीय दृष्ट्या जागृत असलेले गाव म्हणुन त्याची वेगळी ओळख आहे या गावाची लोक संख्या 18000 आस पास असुन या वस्तीतुन बावधन परिसरा कडे विद्यार्थी शेतकरी शेतमजुर यांना येण्या- जाण्यासाठी बावधन ओढा ते बावधन हा रस्ता फारच जवळचा असल्याने त्याचा सर्व जण वापर करत असतात
बावधन ओढा ते बावधन ह्या रस्त्या च्या दुतर्फा गावातील शेतकऱ्यांचे शेकडो हेक्टर जमिनी असल्याने ते याच रस्त्या वरुन आपल्या बैल गाड्या ट्रॅक्टर मधुन शेती उपयोगी औजारे खते बि बियाने जिव मुठीत धरुन घेवुन जात असतात अनेक शेतकरी पादचारी आपली जनावरे शेतात घेऊन असताना गंभीर अपघात झाले आहेत हा रस्ता तातडीने दुरुस्त व्हावा अशी मागणी शेतकऱ्यांनी गेल्या अनेक वर्षा पासुन वाई पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे लेखी निवेदनाव्दारे करुन देखील येथील अधिकाऱ्यांनी मागणीच्या निवेदनाला केराची टोपली दाखवल्याने शेतकऱ्यांमधून संतापाची लाट उसळली आहे
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देवून तो तातडीने दुरुस्त करुन द्यावा अन्यथा शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे .