कराड दि.29
आपल्या नेत्या विषयी प्रेम किती पटीन असावं हे प्रत्येक कार्यकर्त्याला माहीत असतं . त्या प्रेमापोटी प्रसंगी आपले घरदार, पैसा,सुख सोयी समाजातील गावातील प्रतिष्ठा सर्वकाही पणाला लावून तो आपल्या नेत्या विषयीची जी तळमळ व प्रेम असते तो त्या पद्धतीने व्यक्त होत असतो.
खरंतर कट्टर समर्थक, कट्टर कार्यकर्ता किंवा माझा नेता पावरफुल कसा?
हे जगाला खास करून गावातीलच विरोधी गटाला सांगण्यात त्या कार्यकर्त्याला मोठा अभिमान असतो.
असाच एक कट्टर समर्थक आज आपल्या भेटीला येतोय त्याच नाव आहे
सुदर्शन काकडे. धोंडेवाडी ता. कराड येथील.
हे गाव फारसे लोकसंख्येचं नसलं तरी बऱ्याच क्षेत्रामध्ये प्रगती केलेलं गाव आहे. या धोंडेवाडी मध्ये एक खाजगी रिक्षा चालक जो कराड ते उंडाळे या भागात आपला उदरनिर्वाह रिक्षा चालवून करतोय. त्याचा आपल्या नेत्या विषयीचा आदर खरोखर वाखागण्याजोगा आहे. देवाप्रमाणे आपल्या नेत्याला त्याने पुजले आहे. याचे एक उदाहरण ईथे देता येईल ते म्हणजे सुप्रसिद्ध सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांचं. दक्षिणेमध्ये त्यांना देवाप्रमाणे पूजले जाते. अगदी त्याच पद्धतीन सुदर्शन काकडे ने डॉक्टर अतुल भोसले यांना स्वतःच्या हृदयात स्थान दिले आहे. डॉक्टर अतुल भोसले यांचा तो कट्टर समर्थक आहे.
जणू आपलं कुलदैवतच तो त्यांना मानतो. खास करून कोरोना काळात अतुल बाबांनी केलेल्या कामाची त्यांन प्रशंसा केलीय. गोरगरीब गरजूंना बाबा अनेकविध प्रकारे कशी मदत करतात. तसेच लाखो युवांना रोजगार देण्याचे काम हे बाबांनी केलंय. व ते मी जवळून पाहिलय असं तो स्पष्टपणे सांगतोय.
बाबा राजकारणात येण्याअगोदरच
सुदर्शन काकडे नी त्यांना आपले दैवत मानले होते.बाबांच्या कराड दक्षिण मधल्या अनेक दौऱ्या दरम्यान तो बाबांना प्रत्यक्ष भेटला ही होता बाबांच्या कामाचा बोल बाला तो आपल्या छोट्याशा व्यवसायातून म्हणजे रिक्षा चालवत असताना प्रवाशांना सांगून करत असतो. त्याच हे बाबांवरचं प्रेम साऱ्या कराड दक्षिणच्या लोकांना सर्वश्रुत आहे. खुद्द त्याच्या गावात म्हणजे धोंडेवाडीत तो डॉक्टर अतुल भोसले यांचा खंदा समर्थक म्हणून परिचित आहे.
या बाबांच्या प्रेमापोटी बाबांचे चित्र टॅटूच्या स्वरूपात आपल्या हातावर कायमचं कोरल आहे. त्यामुळे गावात त्याची एक वेगळी ओळख आहे.
बघा आपल्या नेत्यासाठी त्याने हातावर टॅटूच्या स्वरूपात बाबाचे चित्र काढून एक वेगळा असा संदेश राजकारणातील इतर कार्यकर्त्यांना दिला आहे.
यावरून आपल्या लक्षात येईल की ‘नाद पाहिजे नादा शिवाय काय नाही.
































