रक्तदान शिबिराचा शुभारंभ करताना श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले. शेजारी मान्यवर…
समाजकार्यात गोडोलीकरांनी इतिहास घडवला सौ. वेदांतिकाराजे; सलग २२ व्या वर्षी रक्तदान शिबीर उत्साहात
सातारा- प्रत्येकालाच सामाजिक जबाबदारीचे भान असणे आवश्यक आहे. सलग २२ व्या वर्षी अखंडितपणे रक्तदान शिबीर घेण्याचा अनोखा विक्रम गोडोलीकरांनी केला आहे. गरजू रुग्नांना रक्त मिळावे या उद्देशाने दरवर्षी रक्तदान शिबीर घेणाऱ्या गोडोलीकरांनी समाजकार्यात इतिहास घडवला आहे, असे गौरवोद्गार कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी काढले.

आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त कर्तव्य सोशल ग्रुप, गोळीबार मैदान गोडोली मित्रसमूह यांच्यावतीने पालवी चौक येथे आयोजित रक्तदान शिबिराच्या उदघाटनप्रसंगी सौ. वेदांतिकाराजे बोलत होत्या. यावेळी नगरसेवक शेखर मोरे- पाटील, सौ. मनीषा काळोखे, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, माजी सदस्य वनिता कन्हेरकर, शरद काटकर, भाजपच्या सौ. सुवर्णा पाटील, व्यंकटराव मोरे, फिरोज पठाण, रवी पवार, प्रकाश घाडगे, अविनाश माने, सुनील मोरे, आबा जगताप, गणेश निकम, रवी अहिरे, पूनम निकम, उषा जाधव, सोनल माने, सुवर्णा कणसे, रुपाली घाडगे, चेतन जाधव, रोहन काळे, सागर भोसले, अनिरुद्ध पवार, बंटी सुर्वे, विलास कासार आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आयोजक रवी पवार यांनी ४३ वे रक्तदान केले. सौ. वेदांतिकाराजे यांनीही तब्ब्ल ३४ व्या वेळी रक्तदान केले. शिबिरात एकूण ४५ रक्तदात्यांची रक्तदान करून सामाजिक कर्तव्य बजावले. महिला रक्तदात्यांनी चांगला प्रतिसाद दिला. रवी पवार यांच्या उपक्रमाचे सौ. वेदांतिकाराजे यांनी कौतुक केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सर्वांनी माणुसकीच्या नात्याने रक्तदान केले पाहिजे. सर्वांनी रक्तदान करून गरजू रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.






















