पाटण दि. 28 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात गुरूवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात नव्याने आणखी 17 बाधीतांची वाढ झाली आहे. शुक्रवारी नव्याने पाच व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण 637 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 420 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे तर कोरोनामुळे 30 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 187 बाधीतांवर विविध ठिकाणी उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यातील गुरूवारी आलेल्या अहवालात साबळेवाडी येथील 58 वर्षे पुरूष, तारळे 43 पुरूष, विहे 48 पुरूष, 65 महिला, येराडवाडी 36 पुरूष, मल्हारपेठ 69, 35 पुरूष, नवसरी 36, 27 महिला, 76 पुरूष, पाटण 40, 41 पुरूष, म्हावशी 40 पुरूष, निसरे 55 महिला, उरूल 45 पुरूष, गोकुळतर्फ हेळवाक 27 महिला, कसणी 45 पुरूष अशा एकूण सतरा व्यक्तींचे कोरोना अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. याशिवाय या बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल व काहींना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या 187 बाधीतांवर कृष्णा, सह्याद्री हाॅस्पीटल कराड, सिव्हिल हाॅस्पीटल सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे तर काहींना होम क्वारंटाइन करून तेथे पुढील उपचार सुरू आहेत. या बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना पाटण येथील प्रियदर्शनी महिला वसतीगृह, मिल्ट्री बाॅइज होस्टेल, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जुने वसतीगृह व तळमावले येथील कोरोना केअर सेंटर व काहींना होम क्वारंटाइन करून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. शुक्रवारी नव्याने आणखी पाच व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत 420 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असल्याचेही श्रीरंग तांबे व डाॅ. आर. बी. पाटील यांनी सांगितले.