दौंड ता.२६-: मसनेरवाडी ता.दौंड जि. पुणे येथील विकास रोहिदास जाधव व रोहिदास बाबा जाधव यांच्यावर बनावट हक्कसोड पत्राचा इंडेक्स २ करून त्याच्या आधारे सात बाऱ्यावर नावे लावून घेतल्याने दौंड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल…
सुनील निंबाळकर /पुणे प्रतिनिधी
दौंड पोलीस स्टेशन गु र नं 184/2021 भादवि कलम 420,465,467,468,471,34 मधील आरोपी (१) विकास रोहिदास जाधव (२) रोहिदास बाबा जाधव दोन्ही रा. मसनेरवाडी ता.दौंड जि .पुणे यांनी संगनमत करून इंडेक्स २ बनावट तयार करून यातील फिर्यादी राजेंद्र सीताराम जाधव रा. माळेगाव बुद्रुक ता.बारामती जि. पुणे यांची जमीनीची सातबारा वरील नावे कमी करून सातबारा वर आपले नाव लावले वगैरे मजकूर चा गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी ना गुन्ह्याचे कामी अटक केली होती व त्यांना पाच दिवस पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आली होती. रिमांड मुदतीत आरोपींचा मोबाईल जप्त केला असून बनावट कागदपत्रे तयार करण्याकरिता आरोपीस मदत करणारा नवनाथ ढगे राहणार मसनेरवाडी ता. दौंड निष्पन्न झाला आहे.सदर गुन्ह्याचा तपास पोउनि वाघमारे करीत आहेत.
१९९६ पासून कोर्ट मॅटर चालू असून तो अद्याप त्यावर कोर्टाचे कामकाज चालू असून पैशाच्या जोरावर आरोपी ने आम्हाला आतापर्यंत त्रास दिला आहे. त्यातून मसनेरवाडी तालुका दौंड जिल्हा पुणे येथील आम्हाला मसनेरवाडी एक व खोरवडी चा हद्दीतील सर्व सातबारा वरील आमच्या नोंदी कमी करण्याचे चुकीचे कारस्थान सदर आरोपीने केले आहे.तरी या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई व व त्यांची सखोल चौकशी करून त्यांना शिक्षा व्हावी अशी आमची इच्छा आहे. शासनदरबारी आमची विनंती आहे की यामध्ये लक्ष घालून आम्हाला सर्व जमिनीत अर्धा हिस्सा आमच्या हिस्सा प्रमाणे येत असेल तो मिळावा. संपूर्ण जमिनीचे मोजमाप करून आमचा हिस्सा आम्हाला देण्यात यावा व आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांना न्याय मिळावा हीच शासनदरबारी विनंती….
फिर्यादी.. राजेंद्र सिताराम जाधव, राहणार- माळेगाव ,तालुका – बारामती, जिल्हा- पुणे…
सदर विषयाचा पुनरवलोकन प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो पुनरवलोकन प्रस्ताव प्राप्त होताच, पूर्वीप्रमाणे ज्या काही नोंदी असतील त्याप्रमाणे करण्यात येतील करण्यात येतील.
– संजय पाटील, दौंड तालुका, तहसीलदार
"सदर विषयाचा कायदेशीर तपास चालू आहे.या मधील सर्व दोषी वर शासकीय नियमानुसार कारवाई होईल...
..मयूर भुजबळ डी.वाय.एस.पी दौंड तालुका"
"सदर फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांचा प्रथमदर्शनी सहभाग दिसून येत असल्याने त्यांचा सुद्धा आरोपी म्हणून समावेश करून त्यांच्याविरुद्ध देखील कायदेशीर कारवाई झाली पाहिजे.…. राहुल तावरे फिर्यादी यांचे वकील"






















