महाराष्ट्र न्युज फलटण प्रतिनिधी गणेश पवार–
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे यासाठी बऱ्याच सामाजिक संस्था लोकांना रक्तदान करण्याचे आवाहन वारंवार करत आहेत या गोष्टीची सामाजिक बांधिलकी जपत फलटण येथील शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान यांनी आज फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरामध्ये २५२ धारकरी यांनी भाग घेऊन रक्तदान केले.
पुण्यश्लोक श्री शिवाजी महाराज पुण्यतिथी व श्री हनुमान जन्मोत्सवाचे ऒचित्य साधून शिवप्रतीष्ठान च्या धारकर्यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते यात २५२ धारकर्यांनी रक्तदान केले , या प्रसंगी धारकर्यांशी संवाद साधला असता , श्री संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली निर्व्यसनी व देव देश धर्मासाठी निस्वार्थपणे काम करणार्या राष्ट्रभक्तांची नवीन पिढी तयार करण्याचे काम श्री शिवप्रतीष्ठान करत असुन या देशावर कोणतीही आपत्ती आली तरी याच पद्धतीने आम्ही कार्य करू असे मनोगत त्यांनी व्यक्त केले,या उपक्रमास महाराजा उद्योग समुह फलटण यांचे विषेश सहकार्य लाभले.




















