कोरोनाचा मृत्यूदर रोखण्यात अपयश; नाकर्तेपणामुळे कोरोनाचा उद्रेक
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्र्याच्या नाकर्तेपणामुळे तालुक्यात सध्या कोरोनाचा उद्रेक वाढला आहे. कोरोना रुग्णांसाठी तालुक्यात अपु-या सोयी सुविधा असल्यामुळे आजपर्यंत ५० पेक्षा जास्त रूग्णांचे बळी गेले आहेत.आता स्वतःचा निष्क्रियपणा लपविण्यासाठी, जतनेला स्वतःची काळजी स्वतः घ्या असे हे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. त्यामुळे कोरोनासंदर्भात वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरलेल्या इंदापूर तालुक्याच्या निष्क्रिय लोकप्रतिनिधीचा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी ( दि. ८ ) प्रसिद्धीपत्रक काढून निषेध नोंदविला आहे.
भारतीय जनता पार्टीचे इंदापूर तालुकाध्यक्ष अॅड. शरद जामदार, जेष्ठ नेते मारुती वणवे, पुणे जिल्हा सचिव तानाजी थोरात, किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक माऊली चवरे, इंदापूर शहराध्यक्ष शकील सय्यद, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष राम आसबे यांनी हे पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
कोरोनाची सुरवात मार्च मध्ये झालेली असताना, आजपर्यंत तुम्ही तालुक्यात अतिदक्षतेच्या कोणत्याही उपाययोजना गांभीर्याने केल्या नाहीत. तुम्ही सत्तेत आहात, जनतेची जबाबदारी तुम्हची आहे. आज कोरोनाची परिस्थिती तालुक्यात भयावह असताना सहकारी संस्थाचे विषय काढुन विषयांतर करून राजकारण करत स्वतःची निश्क्रियता, अपयश झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न तुम्ही का करत आहात.
लोकप्रतिनिधी म्हणून पदावर असताना एकही सहकारी संस्था अथवा उद्योग निर्माण केली नाही. तालुक्यातील तरूण बेरोजगारांची संख्येत वाढ झाली आहे. तुम्ही किती बेरोजगार तरूणांना नोकरी दिली याची आकडेवारी जाहीर करा. तुम्ही ज्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते व आजही संचालक आहात, त्या संस्थेची आज काय अवस्था आहे हे सांगायला विसरले की काय? असा सवाल या प्रसिद्धीपत्रकात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
इंदापूर तालुक्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या १२०० च्या वरती गेली असून अपु-या सोयी सुविधांमुळे ५० पेक्षा जास्त रूग्णांचे बळी गेले आहेत. इंदापूर तालुक्यातील कोरोना मृत्यु दर ४ टक्के म्हणजेच जगात सर्वाधिक आहे. या ५९ बळी गेलेल्या लोकांची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून कोणाची आहे.कोरोना रुग्णांची संख्या विचारात घेता पुरेसे डाॅक्टर नाहीत, गोळ्या औषधांची कमतरता, अपुरी बेडची संख्या, आॅक्सिजन व व्हेंटिलेटरचा आभाव या सर्व बाबींचे वेळेत नियोजन न केल्यामुळे आज ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, हीच का तुमची क्रियाशिलता असा सवाल भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.जेष्ठ नेते शंकरराव पाटील यांचा वारसा हर्षवर्धन पाटील यांना असल्यामुळे पराभवाने खचून न जाता आज देखील तालुक्यातील जनतेचे, कोरोनाग्रस्त लोकांचे प्रश्न सोडविण्याचे काम करीत आहेत. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचेवरील टिका यापुढे आम्ही सहन करणार नाही. सत्तेसाठी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करा,नाहीतर आम्ही देखील तुमच्या विरोधात रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करू,असा इशाराही भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे .