कराड/प्रतिनिधी : कराड तालुक्यातील पत्रकार अथवा त्यांच्या कुंटूबियातील व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्यास तसेच औषधोपचार व आँक्सीजन बेडची गरज लागल्यास त्यासाठी तालुका प्रशासनाने राखीव बेड ठेवून पत्रकारांनासाठी आँक्सीजन बेड व मोफत औषधोपचारसाठी तातडीने उपाययोजना करावी. अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने मंगळवारी कराडचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे व तहसीलद अमरदीप वाकडे यांना देण्यात आले. लोकशाहीचा चौथा आधास्तंभ असणाऱ्या तालुक्यातील पत्रकारांची काळजी प्रशासनाने घ्यावी अशी मागणी करण्यात आली असून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील प्रशासणाला या संदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे यांनी सांगितले.
कराड तालुक्यातील पत्रकार बांधवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने ठोस पावले उचलावीत यासाठी उपविभागीय अधिकारी कराड व तहसीलदार यांना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रवीण कांबळे, इलेक्ट्रॉनिक मिडिया जिल्हाध्यक्ष विकास भोसले, जिल्हा सचिव सचिन बर्गे कराड दक्षिण तालुकाध्यक्ष नितीन ढापरे, कार्याध्यक्ष अशोक मोहने, कराड शहराध्यक्ष संदिप चेणगे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश चव्हाण, संपादक युवराज मस्के, सुरेश माने यांनी निवेदन दिले.
कोरोना विरोधातील लढाईत बहुतांश पत्रकार जीवाची बाजी लावून काम करीत आहेत. जनता व प्रशासनामधील महत्वपूर्ण दूवा म्हणून कार्यरत असणाऱ्या पत्रकारांनी लोकांना चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात, लोकांचे जीव वाचावेत यासाठी जनजागृती, प्रबोधन करुन चुकीच्या गोष्टींना आळा घालण्याचे काम सातत्याने लेखणीतून करत आहेत. या वैश्विक महामारीत पत्रकार हे जनता आणि प्रशासनासोबत आहेत. पंरतु प्रत्यक्षात काम करताना पत्रकारही कोरोनाच्या कचाट्यातून सुटलेले नाहीत त्यामुळे आजवर राज्यातील १२५ पेक्षा अधिक पत्रकार बांधवांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाने मृत झाल्याने पत्रकारांना ५० लाखांचे विमा संरक्षण मिळावे, फ्रंट लाईन वर्कर म्हणून समावेश व्हावा यासाठी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुडे, राज्य संघटक संजय भोकरे, राज्यसरचिटणीस विश्वास आरोटे, प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, प्रदेश कार्यकारणी सातत्याने मुख्यमंत्री व राज्य शासण,केंद्र शासण यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत.
या मागण्यांना यश येईल मात्र तो पर्यंत त्या त्या तालुक्यातील प्रशासनाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांची जबाबदारी घेवून संकट काळात आवश्यक सहकार्य करणे अपेक्षित आहे. नितिन ढापरे म्हणाले, सातारा जिल्ह्यात कोवीड 19 चे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. या अनुषंगाने कराड तालुक्यातील सर्व प्रिंट व इलेक्ट्राॅनिक मिडीयातील प्रतिनिधी/पत्रकार फ्रंटलाईन वर्कर म्हणुन वार्तांकनाचे काम करुन प्रामाणिकपणे सेवा देण्याचे काम करुन समाजापुढे वस्तूस्थितीचे चित्रण करत आहेत. वास्तविक राज्यभरात आत्तापर्यंत १२५ हुन अधिक पत्रकारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे .त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर हालाखीची वेळ आली आहे. म्हणून आपल्या कराड तालुक्यातील पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी तालुका प्रशासनाने पुढाकार घेऊन त्यांना आपतकालिन परिस्थितीत तातडीची सेवा उपलब्ध करुन द्यावी. यामध्ये पत्रकारास व त्याच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा झाल्यास व उपचाराची वेळ पडल्यास मोफत उपचार व राखीव ऑक्सिजन बेडचे नियोजन करण्यात यावे अशी मागणी केली. दरम्यान या मागणीचा विचार करून सहकार्य करण्याचे आश्वासन तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी दिले आहे.






















