फलटण प्रतिनिधी
जागतिक डॉक्टर डे दि 3 जुलै रोजी साखरवाडी तालुका फलटण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी साखरवाडी आरोग्य केंद्रासह परिसरातील रावडी,फडतरवाडी, जिंती,होळ,निंभोरे,चौधरवाडी येथील सर्व आरोग्य सेवक व अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात सर्व वैद्यकीय अधिकारी व सेवक यांच्यावर मुख्य प्रवेशद्वारापासून फुलांची उधळण करून फटाके फोडून करण्यात आली यानंतर सर्व अधिकारी व मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी तालुका आरोग्य अधिकारीएस बी कोंडके,वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे पाटील, कनिष्ठ सहहायक एस एस गायकवाड,आरोग्य सहहायक दत्तात्रय साळुंखे,आरोग्य सेवक समीर मुलाणी, आरोग्य सोसायटीचे चेअरमन विक्रमसिंह खानविलकर,संचालक तानाजी धुमाळ,लक्ष्मण वणवे,प्रशांत धांडगे,रमाकांत मगर,साखरवाडी गावचे तंटा मुक्ती उपाध्यक्ष दिलीप बाबा पवार प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य सेवक,सेविका व परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती






















