महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी:
कराड येथील असंघटीत महिला कामगार व निराधार वृद्ध लोक अशा एकूण 75 गरीब लोकांना सातारा जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष झाकीर पठाण यांचा वतीने मोफत जेवणाची सोय करण्यात आली आहे त्यांच्या या उपक्रमाचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे
सध्या कोरोनाचा पीक पिरियड सुरू असल्याने लॉक डाऊन पडले आहे त्यामुळे अर्थातच सर्वच काम धंदे बंद अवस्थेत आहेत त्यामुळे ज्यांचे हातावर पोट अवलंबून आहे त्यांचे अक्षरशः हाल सुरू आहेत त्यांच्या मदतीला जिल्ह्याचे काँग्रेसचे अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर पठाण हे धावून गेले आहेत यांच्यावतीने जवळजवळ 75 गरीब हातावरचे पोट असणाऱ्या असंघटित महिला कामगार तसेच निराधार वृद्ध लोकांना जेवण देण्यात येत असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिली
टीप टॉप सर्व्हिसेस यांच्या सहकार्याने हे जेवण बनवून गरिबांना दिले जाते…
त्यांच्या या कार्याचे जिल्ह्यातून कौतुक होत आहे त्यांचा इतरांनी पण आदर्श घ्यावा अशी कराडकरांच्यात चर्चा आहे या कोरोना काळात त्यांनी गरजू लोकांना विविध प्रकारची मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे





















