महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी:
कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून मंगळसुत्र चोरीस जप्त गुन्हा उघड दि.१८/०५/२०२१ रोजी कोविड हॉस्पिटल मधून उपचारकामी दाखल असलेल्या ६५
वर्षीय महिलेचे मंगळसुत्र चोरीस गेलेले होते. सदर बाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. सदर गुन्ह्याचा तपास प्रकटीकरण शाखा कराड यांचेकडून सुरु होता. नमुद गुन्ह्यात चोरीस गेलेले दोन तोळे वजनाचे ६५०००/- रुपये किंमतीचे मंगळसुत्र तपासाअंती गुन्हा उघड करून जप्त केलेले आहे. सदर उपचारकामी दाखल असलेल्या महिलेचे मंगळसुत्र कोविड वार्ड मधील काम करणाऱ्या महिला नर्स स्टाफने चोरी केली असल्याचे उघड झाले. सदरचे चोरी झालेले मंगळसुत्र हॉस्पिटल प्रशासन यांच्या मदतीने कराड पोलीसांनी जप्त केलेले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल .अपर पोलीस अधीक्षक श्री. धीरज पाटील . उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.रणजीत पाटील व कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख विजय गोडसे सहा.पोलीस निरीक्षक कराड शहर पो.ठाणे पोलीस हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पोलीस नाईक तानाजी शिंदे, संजय जाधव, मारुती लाटणे, विनोद माने, आनंदा जाधव,
प्रफुल्ल गाडे यांनी केलेली आहे.