खाजगी रुग्णांलयामधुन फसवणुक व आर्थिक लुटीच्या संदर्भात दिले निवेदन
महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी: कोरोना महामारीच्या काळामध्ये अनेक खाजगी रुग्णांलयामधुन डॉक्टर व सेवगवर्गाने निष्काळजीपणे वागणुक देवुन केलेली फसवणुक व आर्थिक लुटीचे अनेक प्रकार समोर येत आहेत. अतिदक्षता विभागात ट्रिटमेंट चालु असल्याचे सांगूण लाखो रुपये जमा करुन घेत आहेत. चालु असलेल्या
ट्रिटमेंट ला पेशंन्ट प्रतिसाद देतो आहे किंवा नाही. हे सुदधा समजत नाही. काही वेळेला पेशंन्ट दगावला असला तरी त्याची कल्पना नातेवाईकांना लवकर दिली नाही, व उपचार चालु ठेवला असल्याचे चर्चा नागरीक करीत आहेत.करोना उपचारासाठी असणारी लस किंवा बेड शिल्लक असुन सुद्धा शिल्लक नसल्याचे सांगून ज्यादा रक्कम देणाऱ्यांना दिली जात असल्याचे बोलले जात आहे. या सर्व वैध्यकिय सेवे बाबत नागरीक भयभित व संभ्रमित आहेत. परंतु या विषयी कोणताही ठोस पुरावा उपलब्ध नसल्याने हॉस्पिटल सेवा व नागरीक यांच्यात तान-तनाव निर्माण होवुन भांडणे सुद्धा होत आहेत. हे होवु नये यासाठी सर्व हॉस्पिटलमध्ये पेशंन्ट ॲडमिट झाल्यापासुन डिस्चार्ज मिळेपर्यंत ऐशंन्टला कशी वागणुक दिली जात आहे. व कोणती औषधे दिली जात आहेत, पेशंन्ट काय रिसपॉन्स देतोय याचे लाईव्ह प्रक्शेपन सी.सी.टी.व्ही मार्फत नातेवाईकांना दिसावे. तसेच डॉक्टर, पेशंन्ट व नातेवाईक यांच्यात काय वाद-संवाद झाला याचे सी.सी.टी.व्ही फुटेज मिळयास डॉक्टर पेशंन्ट व नातेवाईक यांच्यात पारदर्शकता येईल व वैध्यकिय सेवेबाबत आदर निर्माण होवुन कोणतेही ताण-तणाव राहणार नाहीत व कोणाच्याही मानवी हक्काचे उल्लंघन होणार नाही, यासाठी सर्व हॉस्पीटलमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवुन लाईव्ह प्रक्शेपन व
सी.सी.टी.व्ही फुटेज कायम स्वरुपी कार्यरत रहावे, अशी मागणी करणारे निवेदन मा. जिल्हाधिकारी साहेब,मा. आरोग्यमंत्री साहेब व मा. मुख्यमंत्री साहेब यांना मानवीहक्क संरक्षण आणि जागृती संस्थेचे सातारा जिल्हा संघटन सचिव श्री. प्रकाश महादेव घोडके ऑ. प्रणव टोनपे, संतोष पवार, राहुल घोलप व सचिन पालेकर यांनी दिले