लोणंद : दहा हजार किमतीचा मोबाईल व रोख रक्कम लंपास करणा-या राहुल विजय चौगुले वय 29 रा.शनिवार पेठ कराड तालुका कराड व महावीर संजय जाधव वय 19 राहणार वडार गल्ली लोणंद तालुका खंडाळा या संशयित आरोपींना लोणंद पोलीसांनी केले जेरबंद.
दिनांक ०१/०८/२०२१ रोजी फिर्यादी संजय किसन काशिद रा. निरा ता. पुरंदर यांनीलोणंद पोलीस ठाणेत येवुन त्यांना दि. २१/०६/२०२१ रोजी दोन अनोळखी इसमांनी राहते घरी सोडण्याचे बहाण्याने जुना टोलनाका पाडेगाव ता. खंडाळा येथे जबरदस्ती खिशातील मोबाईल व रोखरकम काढून चोरी केलेची फिर्याद दिलेने लोणंद पोलीस ठाणेत गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्हयाबाबत प्रभारी अधिकारी विशाल वायकर यांनी गुन्हें प्रकटीकरण पथकास सुचना दिल्या. तांत्रिक विश्लेषणाच्या व गोपनीयमाहीतीच्या आधारे आरोपींचा शोध घेवुन त्यांचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न करण्यातआला.गुन्हयातील एका आरोपीस कराड येथून ताब्यात घेण्यात आले असुन मा. न्यायालयाने त्यास ३दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे. तर दुसऱ्या आरोपीस लोणंद येथून ताब्यात घेण्यात आले.गुन्हयातील चोरीस गेलेला १०००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा मोबाईल फोन व२५०००- रोख रक्कम आरोपीकडून हस्तगत करण्यात आली आहे, पोलीस अधिक्षक सो, सातारा अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षकधीरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी सो, फलटण तानाजी बरडे यांचेगार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक विषाल वायकर पोलीस उप-निरिक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना. संतोष नाळे, श्रीनाथ कदम अभिजीत घनवटशेकत शिकलगार अविनाश नलवडे,विठठल काळे, फैय्याज शेख, अविनाश शिंदे यांनी कारवाईत सहभागघेतला असुन पुढील तपास पोलीस नाईक संतोष नाळे करीत आहेत.