सातारा प्रतिनिधी – आज सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य व जावली तालुक्याचे वतीने जावली तालुक्याचे गटविकास अधिकारी मा.सतीश बुद्धे ,आणि सा. बा. विभाग सातारा जावली चे उपअभियंता मा कृष्णात निकम यांचा भव्य असा सन्मान सोहळा पंचायत समिती जावली च्या सभागृहामध्ये पार पडला
या कार्यक्रमासाठी जावली तालुक्याचे प्रांताधिकारी टोनपे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा अमोल माने तालुका आरोग्य अधिकारी मोहिते सरपंच परिषद पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष समाधान पोफळे ,जावली तालुकाध्यक्ष, महिला तालुकाध्यक्ष सरिता शेलार व सर्व कार्यकारणी, तसेच 125 गावचे सरपंच उपसरपंच व सदस्य उपस्थित होते
या कार्यक्रमामध्ये नवीन पदभार घेतलेल्या गटशिक्षणाधिकारी यादव मॅडम त्याचबरोबर बांधकाम विभागाचे निकम यांचे जागेवर पदभार स्वीकारलेले इनामदार हे देखील उपस्थित होते त्यांचा देखील भव्य असा सत्कार या ठिकाणी करण्यात आला .
या कार्यक्रमामध्ये तालुक्यातील विविध गावच्या सरपंच यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि साहेबां न विषयी असणारे आपले प्रेम व आपुलकी या माध्यमातून व्यक्त केली व आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. मी माझ्या पगारात खुश आहे या टॅगलाइन चा सर्व सरपंचांनी आपल्या मनोगतात उल्लेख केला ,
हा कार्यक्रम एक आगळावेगळा असा कार्यक्रम असून गेली 18 वर्षात फक्त सरपंचांनी अधिकाऱ्यांनसाठी घेतलेला कार्यक्रम मी पाहिलं नाही, हा महाराष्ट्रातील पहिलाच असा कार्यक्रम असेल असे उदगार गटशिक्षणाधिकारी यादव मॅडम यांनी केला
पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समाधान पोफळे यांनी बुद्धे साहेबांचा चार वर्षातील संपूर्ण कार्याचा चढता आलेख आणि त्यांची काम करण्याची पद्धत ,सरपंचांना वेळोवेळी केलेले सहकार्य ,प्रशासकीय कामात त्यांचा असणारा धबधबा,त्याचबरोबर सर्व सरपंचांना बरोबर असणारे मैत्रीचे संबंध, कोरोना काळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कार्याचे तसेच सरपंच परिषदे ला वेळोवेळी केलेल्या मदतीचे ,असे सर्व केलेल्या कार्याचा उल्लेख केला व त्यासाठी चे आभार मानले ,आणि असे च अधिकारी तालुक्याला लाभावे अशी अपेक्षा व्यक्त केली. खरे तर साहेबांचा हा निरोप समारंभ नसून त्यांना IAS होण्यासाठी चा मार्ग मोकळा करून शुभेच्छा देत आहोत असे भावनिक उदगार काढले,बुद्धे साहेबांनी लवकरच IAS होऊन सातारा जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून यावे अशी आमच्या सर्व सरपंचांची आपणास मागणी आहे आणि त्यादृष्टीने वाटचालीस आमच्या सर्वांच्या शुभेच्छा आहेत असे मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाचे निकम साहेब यांनी गेल्या आठ वर्षांमध्ये जावली तालुक्यामध्ये बांधकाम क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीचे काम केले त्याबद्दल त्यांचा देखील विशेष सत्कार करण्यात आला व त्यांनीदेखील पदोन्नती नंतर सातारा जिल्हा परिषद ला कार्यकारी अभियंता म्हणून येऊन जावली तालुक्याची असणारे नाते जपावे अशी अपेक्षा करण्यात आली .
या कार्यक्रमा त सहाय्यक पोलीस निरीक्षक माने साहेब, तालुका आरोग्य अधिकारी मोहिते साहेब , गटशिक्षणाधिकारी यादव मॅडम,उपअभियंता सा बा विभाग त्याचबरोबर प्रांताधिकारी टोणपे साहेब यांनी साहेबां विषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या
प्रांताधिकारी टोनपे साहेबांनी मनोगत मध्ये त्यांच्या आणि बुद्धे साहेबांविषयी च्या असणाऱ्या मैत्रीचा व त्यांचा असनाऱ्या सखोल अभ्यासाचा उल्लेख केला व ते आहेत म्हणूनच जावली ला आलो असे विधान केले, व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सरपंच परिषदेचे या कार्यक्रमाबद्दल कौतुक केले
सतीश बुद्धे साहेबांनी आपल्या भावना व्यक्त करताना जावली तालुक्याची आपली सरपंचान बरोबर असणारी आपली नाळ ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने आणखी मजबूत बनली आहे आणि जावली तालुक्यातील सरपंच यांच्या वतीने केलेला हा सत्कार आयुष्यात कधीही मी विसरणार नाही, भविष्यात माझी पदोन्नती झाली, IAS झालो तर सातारा जिल्हा परिषद लाच माझा पहिला प्रेफरन्स असेल आणि आपल्याशी असणारे नाते हे कधीही तुटणार नाही अशा भावनिक शब्दात त्यांनी सर्व सरपंचांचे व सरपंच परिषदेचे आभार मानले.
निकम साहेब यांनी देखील तालुक्यामध्ये काम करतानाचा अनुभव आणि सरपंच यांचे बरोबर असणारे ऋणानुबंध असेच राहतील असे सांगितले
या कार्यक्रमासाठी सचिन दळवी,आर डी भोसले , संतोष केंजळे, संजय शेलाटकर ,पुंडलिक पार्टे , रवी कारंजकर ,विजय सपकाळ, संतोष शेलार,अमोल आंग्रे ,आदींनी मोलाचे सहकार्य केले.
राजू जाधव यांनी स्वागत केले ,व ज्ञानेश्वर शेलार यांनी आभार मानले.






















