पाटण : राज्यात मोठ्या भक्तिभावाने गेल्या पाच दिवसापूर्वी आगमन झालेल्या व घरोघरी असलेल्या घरगुती गणपती व गौरीचे आज पाटण भागात उत्साहात पूजन करून मोठ्या भक्तिभावाने विसर्जन करण्यात आले. देशातून, राज्यातून कोरोना रुपी संकट हद्दपार व्हावे अशी प्रार्थना करीत गौरी गणपती यांना निरोप देत विसर्जन करण्यात आले.
दि. १० सप्टेंबर रोजी गणपतीचे उत्साहात आगमन झाल्यावर शनिवारी गौरीचेचे आगमन झाले. घराघरात सजावट करून गौरी गणपतीची प्रतिष्ठापणा करण्यात आली, रविवारी गौरी चे आवाहन घरगुती पातळीवर करून भाजी भाकरीची नैवैद्य दाखविण्यात आला. यावेळेस कोरोना मुळे सगळ्याच सणावर निर्बंध आले असल्याने महिलांचा आवडीचा असणारा गौरीचा सण सुद्धा सध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
गौरी गणपतीचे विर्सजन कोरोना नियमाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत साधेपणाने पारंपारीकरित्या पार पडले. पाटण मधील गणेशभक्तांनी गौरी गणरायाची मुर्ती विसर्जनासाठी व्यवस्थित पणे आणल्या. स्वतंत्रपणे गणरायांच्या मुर्त्यांचे आगमन झाल्यावर पाठोपाठ गौरीना घेऊन महीला सुरक्षित अंतर ठेऊन पुढे गणपती व पाठीमागे गौरी घेऊन ग्रामीण भागातील या महिला उभ्या राहील्या. या वेळी बहुतेक जणांनी गणपतीची विर्सजन आरती घरातच करून गणपती विसर्जनाला आणण्यात आले होते.
या वर्षी गणपतीचे आगमन व विसर्जन वेळी ढोल ताशा गुलालाची उधळण झाली नसली तरी, गावागावामध्ये अमाप उत्साह होता. गावातील ग्रामपंचायतीनी व स्थानिक प्रमुख मंडळीनी आपापल्या गावा मध्ये सलोखा राखत गणेशोत्सव पार पाडला.