१ ऑगस्ट बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी निमित्त टिळक ट्रस्टच्या वतीने टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे.
नरेंद्र मोदींना टिळक पुरस्कार देणे म्हणजे स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिक आणि टिळकांच्या ब्रिटिश विरोधी भुमिकेची थट्टा होत असल्याची भुमिका मांडुन निष्ठावंत काॅंग्रेसजन संतापले आहेत. टिळकांची भुमिका काही प्रमाणात बहुजन विरोधी होती पण त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत योगदान आहे. टिळकांच्या सर्व भुमिकेचे समर्थन करता येणार नाही परंतु टिळक हे आरएसएस आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारधारा पुर्ण पणे मानणारे नव्हते, ते काॅंग्रेस च्या जहाल गटाचे होते. नरेंद्र मोदी ज्या विचारधारेचा वारसा चालवत आहेत त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला नसुन ब्रिटिश धार्जिणी भुमिका घेतली होती. जाती धर्माच्या नावावर समाज व राजकारण करणारे भाजपाच्या विचारांवर गेली नऊ- दहा वर्षे राज्यकारभार करणारे नरेंद्र मोदी यांनी सामाजिक वातावरण बिघडवले असल्याची जनतेची भावना झाली आहे. लोकांची मानसिक शारीरिक आर्थिक स्थिती व्हेंटिलेटरवर आणली आहे. राज्यात आणि देशात लहान मुलांपासून जेष्ठ महिला, गोरगरीब, वृध्द, दुर्बल लोक असुरक्षित वातावरणात जगत आहेत. महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण भारतीय जनता पक्षाचे खासदार ब्रीजभुषणसिंह यांनी केले त्या विरोधात जंतरमंतरवर महिला खेळाडूंनी दिड- दोन महिने केले होते, त्याची तक्रार सुप्रीम कोर्टाने आदेश दिल्यानंतर घेण्यात आली त्यावर प्रंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी मौन बाळगले. गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूर जळतयं, महिला, निष्पाप लोकांचे जीव गेले, दोन महिलांना नग्न करून हजारो पुरुषांच्या उपस्थितीत फिरवत त्यांच्या वर अमानवी अत्याचार करण्यात आले त्याचवेळी महिलेच्या वडील व भावाची हत्या करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने याबाबत संवेदनशील भुमिका घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी तोंड उघडले, त्यातही मोदींनी राजकीय भूमिकाच घेतली. मणिपूर पेटले असताना नरेंद्र मोदी, गृहमंत्री हे कर्नाटक प्रचार दौरा करत होते त्यानंतर नेहमी प्रमाणे नरेंद्र मोदी यांनी अमेरिका व इतर परदेशी दौरे करत होते. देशातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली असुन देश असुरक्षित वातावरणात जगत आहे. अघोषित आणिबाणीच्या दहशतवादी राज्यकारभार चालवणारे नरेंद्र मोदी यांना पुरस्कार देणे म्हणजे १४० कोटी जनतेचा अपमान आहे.