रासपचे अध्यक्ष महादेवराव जानकर यांच्या आदेशानुसार दहिवडी ता. माण येथे राष्ट्रीय समाज पक्षाची माण तालुका आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी कार्यकारणी जाहीर करण्यात आली यामध्ये दत्ताशेठ खांडेकर यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी दादासाहेब दोरगे, माण तालुका रासप महिला आघाडी तालुकाध्यक्ष पदी सुरेखाताई काळेल, सातारा जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी सीमाताई बनसोडे ही नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
माण तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरती निवडणुका लढवणार आहे. त्यामुळे कार्यक्रत्यांनी आता पासुनच बुध बांधणी करावी व पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोचवावेत. प्रत्येक गण व गटाचा आराखडा तयार करवा कारण रासप यापुढे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक स्वबळावर लढवणार असे मत माण तालुका अध्यक्ष दत्ताशेठ खांडेकर यांनी व्यक्त केले.
यावेळी रासपचे पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष अजितदादा पाटील,सातारा जिल्हा प्रभारी खंडेराव सरक,युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर,कायदे सल्लागार ॲड विलास चव्हाण, माण विधानसभा अध्यक्ष प्रा.सचिन होनमाने,दादासाहेब माळवदे, आकाराम कोकरे,शरद दडस,विजय महानवर हे उपस्थित होते.
आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजप , स्थानिक नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.