तात्यासाहेब काळे यांची अध्यक्षस्थानी निवड..
महाराष्ट्र न्यूज फलटण तालुका प्रतिनिधी गणेश पवार
संपूर्ण फलटण तालुक्यासह जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या फलटण तालुका साखर कामगार युनियन निवडणुकीत ना रामराजे व प्रल्हाद पाटील यांच्यात दिल जमाई झाल्याचे चित्र असून मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या साखर कामगार युनियन निवडीचा तिढा सुटला असून काल पुणे येथे ना रामराजे,प्रल्हाद पाटील व तात्यासाहेब काळे यांच्यात झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी तात्यासाहेब काळे यांच्या नावावर शिकामोर्तब झाले.मात्र इतर पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर नसल्याने या निवडी सुद्धा इतक्याच खेळीमेळीच्या वातावरणात होणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.ही निवडणूक अध्यक्ष पद, नवीन विभाग संघटनेत समाविष्ट करणे व कामगारांमधून बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांना डावलने असा आरोप करीत हा वाद प्रथम अप्पर निबंधक पुणे व औद्योगिक न्यायालय(कामगार) सातारा याठिकाणी गेला होता.याची पुढील सूनावणीची तारीख दि २६ ऑगस्ट होती मात्र त्यापूर्वीच दोघांनी मिळून तात्यासाहेब काळे यांची अध्यक्षपदी निवड केल्याने फलटण तालुका साखर कामगार युनियनचा अध्यक्षपदाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे मात्र उर्वरित पदाधिकाऱ्यांच्या निवडीत सुद्धा ही दिलजमाई अशीच राहते का?हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.