जिल्हा प्रतिनिधी : संतोष सुतार
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री झालेले राणे यांनी जे वक्ताव्य केले त्यावरून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राडा करीत आहेत. मात्र कोरोना गेला नाही असे सांगणारे केंद्रीय व राज्य मंत्री तसेच प्रशासन यांनी या प्रकरणात लॉकडाऊन सारखे लक्ष का घातले नाही? भाजप-सेना यांचे भांडण आज अखंड महाराष्ट्र पाहतोय असे भांडण यांनी कोरोना पार्श्वभूमीवर कडक लॉकडाऊन असताना सर्वसामान्य जनतेला मदतीची गरज असताना याचप्रमाणे का भांडली नाहीत?महाराष्ट्रात पंधरा दिवसापूर्वी अनलॉक करण्यात आला असताना काही व्यापारी वर्ग, मजूर वर्ग, शेतकरी, सर्वसामान्य लोक कुठेतरी आपला व्यवसाय करून दोन पैसे कमवून आपले कुटुंब चालवत आहेत, याकडे लक्ष न देता सगळीकडे भाजप आणि सेना यांचा वाद कुठं गेला याकडे लक्ष वेधून घेतले जात आहे का? गेल्या दोन दिवसापासून हा भाजप-सेना वाद चाललेला आहे त्याचा फटका मोठ्या प्रमाणात गोरगरीब जनतेला तिसऱ्या लाटेत का बसणार नाही? एकमेकांवर टीका करने, एकमेकांना अपशब्द बोलणे, गुन्हे दाखल करने, दोघांनी एकमेकांची कार्यालये फोडणे, पोलिसात गुन्हे दाखल करने, यासाठी तुमच्याकडे सक्षम मनुष्यबळ व आर्थिक मदत असेल पण सर्वसामान्य गोरगरीब जनता व्यापारीवर्ग, कामगार वर्ग यांच्याकडे गेल्या दीड वर्षापासून आर्थिक चणचण भासत आहे याकडे कोणाचे लक्ष आहे का? एक महिन्यापूर्वी कृष्णा नदी, कोयना नदीला पूर आला दरडी कोसळल्या तिथे भल्याभल्या मंत्र्यांनी, नेत्यांनी येऊन पाहणी केली त्यांचा पाठपुरावा करणे लांबच राहिले. मात्र आता जे चालले आहे ते यावरून एकमेकांवर टीका करणे, याच्यापेक्षा दुसरे राजकीय नेत्यांनी काही केले नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन येणारे आमदार, खासदार, मंत्री, प्रशासन, आले की सर्वसामान्य जनतेला वाटते की आता आपलं काहीतरी भलं होईल, मात्र नंतर ज्यास्त काही भलं होताना दिसत नाही. भेटीला आलेले नेते, मंत्री, प्रशासकीय अधिकारी कुठे गेले? जनतेला दिलेल्या आश्वासनाच काय झालं त्याचा पत्ता लागत नाही, आणि त्या पाठीमागून सर्वसामान्य जनतेच आज काय झाले? परिस्थितीचा आढावा आज कोणी द्यायला तयार नाही. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. मुख्यमंत्री पद दिले नाही म्हणून स्थापन केलेले व एकमेकांवर खूप प्रेम करणारे महा विकास आघाडी सरकार तयार केले असून हे असंच करा, पण जनतेसाठी लढा हा कुठेतरी जनतेसाठी उभा रहा, जेणेकरून तुम्हाला मतदान करणारी जनता सुखी व्हावी हे महत्वाचे आहे. एखादा शब्द किंवा अपशब्द वापरला म्हणून त्याला व त्यांच्या कार्यालयाला किंवा कार्यकर्त्याला फोडला म्हणून तुम्हाला अभिमान वाटत असेल पण असाच अभिमान सर्वसामान्य कामगार वर्ग, व्यापारी, कोरोना काळात होरपळून गेलेली जनता याना मदत केली म्हणून व्हायला हवा. राजकारनी, पुढाऱ्यांच्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून जात आहे. कुठतरी हे थांबवून आपल्याला मतदान करणाऱ्या जनतेचा विचार व्हायला हवा नाहीतर जनताच एक दिवस हुशार येईल आणि जनताच तुम्हाला उत्तर देईल हे विसरू नका.