महाराष्ट्र्र न्यूज प्रतिनिधी : (वाई )
वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाचवड वाई पाचगणी आणि सुरुर वाई या महामार्गावरील सेदुंरजने, बोपर्डी पसरणी आणि बावधन या परिसरात दुचाकी आणि चार चाकीतुन विना मास्क फिरणाऱ्या 217 नागरिकांच्या विरुद्ध वाई पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी पो. नि.आनंदराव खोबरे, स.पो.नि.अशिश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक. मोतेकर, त्यांच्या पोलीस कर्मचारी व होमगार्ड सहकाऱ्यांनी एकत्र येऊन अशा वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून प्रत्येकी 500 रुपयाप्रमाणे झालेल्या कारवाई मधून एक लाख आठ हजार पाचशे रुपयांचा महसूल गोळा करण्यास पो.नि.खोबरे याना यश आले आहे.
सविस्थर वृत्त असे की गेल्या 20/22 दिवसापासून वाई शहरासह तालुक्यातील गावागावानध्ये कोरोनो रोगाने थैमान घातले आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये गावांमध्ये आज अखेर 1180 पोसिटीव्ह रुग्ण सापडले आहेत तर एकट्या वाई शहरामध्ये 602 इतकी पोसिटीव्ह रुग्णाची संख्या आहे आज अखेर या कोरोनो रोगामुळे 55 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. 20 मे रोजी वाई तालुक्यातील पूर्व भागातील असरे या गावांमध्ये पहिला पोसिटीव्ह पेशंट सापडला होता तेव्हा पासून प्रशासन त्या कोरोनो रोगाकडे पोलिसांच्या सहकार्याने गांभीर्याने पाहत होते पोलिसांचे भरपूर सहकार्य मिळत असल्याने 31 जुलै पर्यंत प्रशासनाला कोरोनो चे रुग्णांना थोपविण्यासाठी आले होते.
वाई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असणाऱ्या गावांमध्ये एक ऑगष्ट पासून कोरोनो रोगाने गावोगावी मुक्काम ठोकत दररोज नवी नवी गावे शोधत शोधत या कोरोनोच्या वाढत्या संख्येमुळे वाई पोलीस ठाण्याचे पो.नि.खोबरे हे चिंता ग्रस्थ झाले. अनेक गावनमध्ये मर्यादा पेक्षा कोरोनो चे रुग्ण सापडत असल्यामुळे याचे कसलेच गांभीर्य नागरिकांमधून दिसून येत न्हवते गावागावातील नागरिक मास्क न लावता किंवा सांमनतर अंतर न ठेवता. फिरताना दिसत होते. त्यामुळे या बेजबाबदार वागणाऱ्या नागरिकांच्या मुळे कोरोनो हा विषाणू गावोगावच्या उंबरट्यापर्यंत जाऊन पोहचला त्यामुळे कोरोनो ची दिवसोनदीवस रुग्ण संख्या वाढत गेल्याने अनेकांना त्यात आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा भीषण घटना घडत असल्यामुळे वाई पोलीस ठाण्याचे पो.नि खोबरे कोरोनो रुगांची वाढती संख्या रोकण्यासाठी त्यांनी आपले सहकारी स.पो.नि कांबळे, पोलीस उपनिरीक्षक मोतेकर, पोलीस कर्मचारी व होमगार्ड कर्मचार्यांशी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व मास्क न लावता अनास्यक दुचाकी व चारचाकी वाहनातून फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर आपणच कारवाई साठी प्राणाची बाजी लावून रस्त्यावर उतरलो तरच कोरोनो ची ही वाढती साखळी तोडण्यास नक्कीच यश येईल असे सर्वांना समजून सांगितले.
संपूर्ण पोलीस ठाणे भागातील शहाभग फाटा, भिमनगर तिकाटने, बावधन नाका, कालेज रोड, एम.आय.डी.सी रोड आशा मुख्य रस्त्यांवर उतरून नागरिकांच्यावर कारवाई करण्याचे ठरल्यानंतर वाई पोलीस ठाण्याचे पो.नि खोबरे स.पो.नि कांबळे पोलीस उपनिरीक्षक मोतेकर हवलदार वी.बी.धायगुडे, कुंभार,शमा.द.माने,धुळे, शिवाजी वायदंडे,किरन निंबाळकर , एस.अ.मोकाशी, मुकुंद माळी,आर.पवार,धिरज नेवसे,दडस, सुमित मोहीते. या सर्वांनी आज दि10 सकाळी 9 वाजल्यापासून भर पावसामध्ये रस्त्यावर उतरून तब्बल 217 विनामास्क फिरणाऱ्या लोकांवर अच्यानक धडकेबाज प्रत्येकी 500 रुपयांची दंडात्मक कारवाई करून 108500 महसूल गोळा करण्यास आणि बेजबाबदार नागरिकांना मास्क वापरण्याचा दंडात्मक धडा शिकवण्यास वाई पोलिसांना मोठे यश आले आहे वाई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये वाढती कोरोनो रुगणाची संख्या थोपवन्यासाठी वाई पोलिसांनी कंबर कसली आहे.