लोणंद प्रतिनिधी
अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ १२ वाजल्यापासुन बेपत्ता झाली होती या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला करण्यात आल्यानंतर लोणंद पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन या दोन्ही मुलांचा शोध घेतल्यावर आज सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यात पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे शव आढळून आले. तर ऐश्वर्या प्रशांत राणे या अडीच वर्षाच्या मुलीचे शव पिंपरे येथील चव्हाण वस्ती येथे आढळून आले पोलिसांनी सदर शव स्थानिक तरुणांच्या मदतीने पाण्याबाहेर काढून पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.