सार्वजनिक बांधकाम विभाग उचलतय का कंत्राटदाराची तळी?———————————-
वाघोली ते आसनगाव रस्त्याचा दर्जा तपासावा! नागरिकांची मागणी———————————-
प्रतिनिधी-पिंपोडे बुद्रुक
दोन महिन्यांपूर्वी वाघोली ते आसनगाव या तीन ते चार किमी. रस्त्याचे काम चालू झाले आणि या रस्त्याचे काम यामहिन्यात संपले.या रस्त्याच्या कामा दरम्यान वाहनचालकांना खूप त्रासाला सामोरे जावे लागले.तसेच कंत्राटदाराने रस्त्याच्या कडेला मोठ- मोठी चार काढून त्यातील मुरूम रस्त्यासाठी वापरला आणि आणि काही ठिकाणी तर माती सुद्धा वापरण्यात आली तसेच रस्त्याच्या कडेला जे मोठी चार खोदली आहे त्या मोठ्या खड्यामुळे एखाद्याचा जीव सुद्धा जाऊ शकतो.याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दिसून न दिसल्यासारखे करीत आहे.तसेच नवीन रस्त्याच्या साईड पट्ट्या काही ठिकाणी मातीने भरल्या आहेत तर काही ठिकाणी भरल्याच नाहीत त्यामुळे रस्त्याच्या वरच्या थरापासून साइड पट्टी कुठे सहा इंच, तर कुठे एक फुटापेक्षाही खोल गेली आहे. त्यामुळे वाहन खाली उतरल्यास पुन्हा वर चढविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. या प्रकारामुळे अपघात होऊ शकतात. तसेच रस्तादेखील काही ठिकाणी काठाने तुटू शकतो आणि आहे.रस्त्याचे काम होत असताना रस्ता कसा होत आहे, याकडे कुणाचेही लक्ष नव्हते. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागचा या कामांवर अभियंता सापडणे दुर्मीळच होते. यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार राहून वर्ष-दोन वर्षातच खड्डे पडले तर नवल वाटण्यासारखे काही नाही. कित्येक रस्त्यांवर साइड शोल्डरदेखील भरले गेले नाहीत.या रस्त्यावर तीन ते चार पूल आहेत त्या पुलाचे संरक्षक कठडे पूर्णपणे रस्त्यात मुजले गेले आहेत आणि हा रस्ता आता काय चंद्रावर जाणार का ?असा नागरिकांचा सवाल आहे.नियमानुसार रस्त्याचे काम झाल्यानंतर १.२ मीटरपर्यंत शोल्डर मुरुमाने भरले गेले पाहिजेत. मात्र, काही ठिकाणी थातूरमातूर मुरूम टाकला,काही ठिकाणी माती, तर काही ठिकाणी काहीच नाही. त्यामुळे रस्ते उंचावर, तर शोल्डर सहा इंच ते फुटभर खाली असे प्रकार अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे वाघोली ते आसनगाव दरम्यान रस्ता काही दिवसांपूर्वी करण्यात आला.कोरेगाव उत्तर भागातून सातारा व कोरेगाव याठिकाणी जाण्यासाठी अत्यंत वर्दळीचा या रस्त्याचे काम होऊनही या रस्त्यावर साइड शोल्डर भरले गेले नाही.
वाघोली ते आसनगाव रस्त्यावर वाघोली नजीक एका ठिकाणी साइड शोल्डर दोन ते तीन फूट खाली आहे. वाहन या रस्त्याखाली उतरल्यास अपघात ठरलेलाच आहे. येणाऱ्या काळात असा प्रकार घडू शकतो. विशेष म्हणजे, या रस्त्याच्या कामाबाबतीत सा. बा.विभागाचे अधिकारी कितपत गंभीर आहेत, असा आरोप नागरिक करीत आहेत.या रस्त्याच्या कामात काहीठिकाणी नियमांचे सर्रास उल्लंघन झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केल्याने कंत्राटदारांचे फावले आहे का असा प्रश्न विचारला जात आहे.त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष द्यावे आणि या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.