कोडोली – आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या छोट्या मोठ्या आजाराकडे दुर्लक्ष करतो. पैशाची चिंता प्रत्येकाला सतावत असते त्यामुळे मोठ्या डॉक्टरकडे आपण जात नाही आणि भविष्यात होणाऱ्या मोठ्या आजाराला आपण बळी पडतो हीच बाब लक्षात घेऊन कै. रामराव निकम शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील छात्राध्यापकांनी प्राचार्य पाटील सर यांच्या संकल्पनेतून आणि प्राध्यापिका बोर्डे मॅडम आणि थोरात मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत भव्य सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन आज १५ मार्च रोजी स्व.शिवराम माने गुरुजी यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त माने कॉलनी देगाव रोड,एमआयडीसी,सातारा येथे १० ते २ या वेळेत ध्येयस्फूर्ती गटाने आयोजित केले आहे. या शिबीरात एम.डी तज्ञ डॉक्टरांकडून सर्व तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये पोट,मेंदू, किडनी,मधुमेह,हाडे,स्त्रीरोग,रक्तदाब, ई.सी.जी,कान,नाक,घसा विकार आणि चक्कर येणे,अंगदुखी आदी आजारांवर उपचार या शिबीरात मोफत करण्यात येणार आहे. तसेच रक्तातील आवश्यक सर्व तपासण्या या शिबीरात होणार आहे. या शिबिरात या ७०८३१०१९८८ क्रमांकावर फोन करून नाव नोंदणी करण्याचे प्रतिपादन ध्येयस्फूर्ती गटाचे अभिरूप मुख्याध्यापक सागर कारंडे सर करत आहे तसेच प्रत्येकाने या शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान ध्येयस्फूर्ती गटातील उपमुख्याध्यापिका अर्चना धाडवे पर्यवेक्षक रजिया शेख आणि सर्व छात्राध्यापक करीत आहे.