महाराष्ट्र न्युज प्रतिनिधी/ खटाव:
खटाव तालुक्यातील वडूज येथे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी जनार्दन कासार यांच्या अचानक उपस्थितीत वडूज नगरपंचायत प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांची संयुक्त कारवाई पार पडली. वडूज शहरातील महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांचे आदेशाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना चांगलाच दंड सोसावा लागला. कोरोना विषाणू प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी व तो रोखण्यासाठी वाढती बाधितांची संख्या लक्षात घेता प्रशासनाने कंबर कसली आहे. नागरिकांना वारंवार सूचना करून देखील उल्लंघन होत आहे असे निदर्शनास आल्याने शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी विना मास्क फिरणारे तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांना नागरिकांना दंड आकारण्यात आला. यामध्ये एकूण 15 नगरिकाना 7400/- रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच ज्या नागरिकांनी अजूनही कोव्हीड चाचणी केली नसेल त्यांनी तातडीने चाचणी करण्याचे आदेश प्रांताधिकारी यांनी दिले. 5 पेक्षा अधिक नागरिकांनी गर्दी केली तर संबंधित दुकान 3 दिवस बंद व दंड आकारण्यात येईल. त्याच बरोबर उद्या होणाऱ्या आठवडी बाजारामध्ये देखील नियमांची कडक अंमलबजाणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी पूर्ण पणे प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जनार्दन कासार यांनी या कारवाई दरम्यान केले.