पाटण प्रतिनिधी : जगात कोरोनाच्या आपत्तीने मोठी हानी केली असुन आता तिसरा लाट येण्याची शक्यता असुन प्रशासनाने तयारी सुरू केली आहे तरी कोरोनाला रोखण्यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणुन प्रत्येकाने स्वतःची काळजी घेत समाजाच्या रक्षणासाठी सज्ज व्हावे असे आवाहन केले व जुन्या वर्गमित्रांच्या भेटीने भारावून गेल्याचे मत धीरज पाटील अप्पर पोलीस अधिक्षक यांनी व्यक्त केले.
कै.ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पाटणच्या सन 1995 व 97 च्या बॅचच्या विद्यार्थी व शिक्षकांचे कोरोना जनजागृती शिबीर बेलदरे ता कराड येथे आयोजीत केले होते.
या शिबिरात डॉ.राहुल साळुंखे यांनी कोरोनाचे बदलते स्वरूप व घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले तसेच केडीयस कार्पोरेशन पुणे या संस्थेने उपस्थिताना कोरोना प्रतिबंधीत साहित्याचे वाटप केले सह्याद्रीत असणार्या ऋतुवर्गीय वनौषधीचा माहिती अनिल बोधे यांनी दिली.
पाटील साहेब पुढे म्हणाले कोराना काळात प्रशासकीय विभागासोबत प्रत्येकाने स्वयंप्रेरणेने कोरोना थोपवण्यासाठी सज्ज व्हावे सुरक्षित अंतर , स्वच्छता व सॅनिटायझरचा वापर हे सहज शक्य असणारे उपाय आहेत त्याचे तंतोतंत पालन करा प्रशासन देत असलेल्या सुचनाचे पालन करा असे शेवटी सागितले.
यावेळी उपस्थित शिक्षकांना मानाचा फेटा व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांना सर्व मित्रमैत्रिणीच्या वतीने मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
या शिबिराचे प्रास्ताविक सुनिल शिदे, सूत्रसंचालन आकाश पाटील आभार अभिजीत पवार यांनी मानले सुरज जगताप अमोल पाटील शिल्पा सावंत निलेश साळुंखे दादा शेटे रमेश लोहार आदीनी मनोगत व्यक्त केले तर शिक्षक क्षीरसागर सर चौगुले सर,कदम सर,ढवळे सर आदीनी माजी विद्यार्थीना मार्गदर्शन केले कोरोनाचे सर्व नियमाचे अंमलबजावणी करत हे शिबीर उत्हासात पार पडले.
ज्यानी वयाच्या सोळावा व अठरावा वर्षी वर्गात एकत्रित दंगामस्ती शाळेधडे गिरवले त्याच वर्गातील तेच चेहरे चाळीस वर्षेनंतर एकत्र आली केस पांढरे डोळ्याना चष्मा तर सोबत लहानगी तर कोण नोकरीला, कोण व्यावसायिक तर कोण डॉक्टर तर कुणी शेतीला व्यवसाय मानलेली सर्वजण आपले व्याप बाजुला ठेऊन केवळ जुन्या आठवणीना उजाळा देण्यासाठी व गुरूजनांचा सत्कार करण्यासाठी सर्व जमले होते.
सुरूवातीला सर्वानी ग्रुप फोटो एकत्र येत परिचय करून दिला पंचवीस वर्षांतील आयुष्यातील बदल एकमेकांशी शेअर केला साहजिकच जिव्हाळा व आपुलकीचे नाते पुन्हा नव्याने ऊर्जित झाले.






















