महाराष्ट्र न्यूज खंडाळा तालुका प्रतिनिधी : डॉ. विश्वजीत कदम त्यांनी स्वर्गीय बाळासाहेब बागवान यांच्या लोणंद येथील निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या नंतर त्यांनी लोणंद शासकीय विश्रामगृह येथे तालुका काँग्रेस कार्यकारणीची बैठक घेतली, व खंडाळा नगरपंचायत व लोणंद नगरपंचायतीचा आढावा घेतला, तिथे भेटायला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते भेटले, हमालांचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला.
त्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्याकडून माहिती घेतली व त्यांना काही सूचना केल्या.मंत्री महोदय यांनी आरोग्य कर्मचारी श्रीमती रंजना रमेश बिडलान या लोणंद नगरपंचायतीच्या कर्मचारी ज्या सेवा निवृत्त झाल्या त्यांचा त्यांच्या कामा बद्दल आभार व्यक्त करून सत्कार केला.
त्यांच्या दौऱ्या दरम्यान त्यांनी वाटेत अंदोरी व भादे गावाला ही भेट दिली. दौऱ्याच्या अंती त्यांनी खंडाळा तालुक्याचे माजी तालुका अध्यक्ष गुरुदेव बरदाडे यांच्या घरी जाऊन भेट घेतली व पुत्रशोकाबद्दल त्यांचे सांत्वन केले.
या वेळेस त्यांचा बरोबर तालुका अध्यक्ष एस वाय पवार तात्या, कार्याध्यक्ष सर्फराज बागवान महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव चांदवडीचे सरपंच जयदीप शिंदे, सातारा युवक काँग्रेसचे अध्यक्ष विराज शिंदे, लोणंद नगरपंचायतचे विरोधीपक्ष नेते राजेंद्र डोईफोडे, नगरसेवक हेमलता कारणावर, महिला तालुका अध्यक्ष खरात ताई, युवा नेते प्रकाश गाडवे, युवा नेते ऋषिकेश धायगुडे, तारिक बागवान, प्रणव डोईफोडे, विशाल भांडळकर, विशाल शेळके व नगरसेवक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
































