सोमेश्वरनगर प्रतिनिधी:विनोद गोलांडे
आज अखेर श्रावण महिन्याची सांगता झाली असून मटण, चिकन, व मासे खाणाऱ्यानि एकच गर्दी आठवडे बाजारात केली असल्याने नॉनव्हेज करण्यासाठी उद्या लागणाऱ्या त्लाल कोथिंबीर ,लिंबू आणि कांदा याला या बाजारात मागणी चांगलीच होती, कोथिंबिरीला पंधरा रुपये ,लिंबू पाच रुपये आणि कांदा वीस रुपये किलो दराने विक्री होत असल्याने हे विकणारे व्यापारी समाधानी आहेत.. कारण यापूर्वी या मालाला मातीमोल बाजारभाव असल्याने मार्केट व शेतकऱ्यांकडून घेऊन सुद्धा भाव नसल्यामुळे ते विक्रेते निराश झाले होते परंतु आज बारामतीतील करंजेपुल येथे मंगळवार आठवडे बाजारात या मालाला चांगला भाव मिळत असल्याने त्यांची विक्रीही चांगली झाली आहे . सोमेश्वरनगर परिसरात सोमेश्वर मंदिल असल्या कारणाने संपूर्ण महिना परिसरातील नागरिक उपवास पळत असतात परंतु श्रावण महिन्याची सांगत असून मटण, चिकन आणि मासे खाणारे खवय्ये असल्याने यांची संख्या बाजारात असंख्य पहावयास मिळत होती आणि हे नागरिक भाव कमी न करता घेत होते.त्यामुळे व्यापारी यांनी मालाला मिलेल्या चागल्या भावाने समाधान व्यक्त करत आहे.
गेल्या आठवडे बाजार पाच रुपयाला मिळणारी कोथिंबिरीची जुडी आज पंधरा रुपये भाव झाला असून कांदा व लिंबु चे असेच बाजारभाव महागले असले तरी असणाऱ्या गरजेमुळे भाव न कमी करत घेत आहे.