महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : कोरेगांव
मा. नामदार श्री. बाळासाहेब पाटील सहकार व पणन मंत्री महाराष्ट्र राज्य, सातारा जिल्हा पालकमंत्री यांना मराठा आरक्षणा संदर्भात मा. सुप्रीम कोर्टाने जी स्थगिती दिली त्या संदर्भात मराठा समाज्याच्या भावना काय आहेत
त्याचे निवेदन देताना विश्व मराठा संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा अध्यक्ष आदरणीय श्रीकृष्णजी पवार, जिल्हा युवक चे अध्यक्ष आदरणीय नागेश जी माने, जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय शिवाजी गुजर , जिल्हा निवेदक अविनाश जी थोरवे, कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद माने, कोरेगाव तालुका उपअध्यक्ष प्रकश जी माने, जिल्हा संघटक अशोक जी लोहार, यांच्या उपस्थितीत जिल्हा अधिकारी कार्यालय सातारा येथे निवेदन देण्यात आले.
त्या संदर्भात मा. मुख्यमंत्र्यांकडे मराठा समाज्याच्या मागण्यांचा योग्य तो पाठपुरावा करण्याचा त्यांनी याठिकाणी विश्व् मराठा संघ महाराष्ट्र राज्य सातारा जिल्हा पदाधिकाऱ्यांना शब्द दिला.